Bollywood / 'थलायवी' साठी भरतनाट्यम शिकत आहे कंगना रनोट, 100 डान्सर्ससोबत शूट करणार आहे रेट्रो सॉन्ग

चित्रपटासाठी एका आठवड्यापासून भरतनाट्यम शिकत आहे

Sep 04,2019 12:55:16 PM IST

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आपल्या चित्रपटात परफेक्शन आणण्यासाठी खूप मेहनत करते. सध्या कंगना जयललिता यांच्या बायोपिकची तयारी करत आहे. ज्याचे टायटल हिंदी मध्ये 'जया' आणि तमिळमध्ये 'थलायवी' आहे. चित्रपटात कंगना 100 डान्सर्ससोबत एक रेट्रो सॉन्ग शूट करणार आहे, जे साउथ सिनेमाची कोरियोग्राफर गायत्री रघुराम दिग्दर्शित करणार आहे.

एका आठवड्यापासून भरतनाट्यम शिकत आहे...
या डान्स सीक्वेंससाठी मागच्या एका आठवड्यापासून कंगना नियमितपणे भरतनाट्यम क्लासमध्ये जाताना दिसत आहे. लोक या चित्रपटासाठी खूपच उत्साहित आहेत कारण जयललिता नेत्या बनण्यापूर्वी एक अभिनेत्री होत्या.

इंस्टाग्रामवर शेअर केली माहिती...
कंगनाचे इंस्टाग्राम अकाउंट टीम कंगना रनोट यावर ही माहिती शेअर केली गेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याचे लेखन 'बाहुबली' आणि 'मणिकर्णिका' लेखक केवी विजय प्रसाद आणि 'डर्टी पिक्चर' यांसारख्या चित्रपटांचे रायटर रजत अरोरा यांनी मिळून केले आहे. कंगना याव्यतिरिक्त अश्विनी अय्यर तिवारीचा चित्रपट 'पंगा' मध्येदेखील दिसणार आहे.

X