आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : कंगना रनोटची बहीण रंगोली चंदेल बॉलिवूड सेलिब्रिटींवर सतत निशाणा साधत असते. अशातच तिने दुसऱ्यांदा आई बनलेल्या शिल्पा शेट्टीवर निशाणा साधला आहे. 44 वर्षांच्या वयात शिल्पा सरोगसीद्वारे आई बनली आहे. रंगोलीने मुलीच्या जन्मासाठी सरोगसीचा आधार घेण्यावरून तिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सोबतच स्वतःदेखील एक मुलगी दत्तक घेणार असल्याची माहिती दिली. रंगोलीचे ट्वीट शिल्पाच्या मुलीच्या जन्माची बातमी समोर आल्यानंतर आले.
रंगोलीने केली मुले दत्तक घेण्याची अपील...
रंगोलीने ट्विटरवर लिहिले, "माझा एक मुलगा आहे मला आणखी एक मूल हवे होते. त्यामुळे मी आणि माझ्या पतीने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, मी इतर कपल्सलाही हे सांगू इच्छिते की, सरोगसीऐवजी बाळ दत्तक घ्या, त्या मुलांना घर देण्याचा प्रयत्न करा, जे आधीपासूनच या जगात आहेत आणि त्यांचे पालक बना. माझ्या बहिणीने मला यासाठी प्रेरित केले. अजय (रंगोलीचा पती) आणि मी सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या आहेत आणि अपेक्षा आहे की, काही दिवसातच आमची मुलगी आमच्या जवळ असेल. कंगनाने तिचे नाव गंगा ठेवले आहे. एका बाळाला घर देऊन मी खूप खुश आहे."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.