आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या वक्तव्यावर भडकली कंगना, म्हणाली - तिला कुणी अधिकार दिला मला जज करण्याचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सेक्सुअल हरॅशमेंट प्रकरणी रोज नवनवीन वक्तव्य समोर येत आहेत. सोनम कपूर आणि कंगना रनोटमधील एक ताजे प्रकरण आहे. सोनमने एका इव्हेंट दरम्यान कंगनाच्या MeToo स्टोरीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, 'कंगना अनेक गोष्टी बोलते. कधी-कधी तिच्या गोष्टी सिरियस घेणे अवघड असते. मी तिच्या हिंमतीची दाद देते'

 

कंगनाने केले पलटवार 
सोनमची ही कमेंट कंगनाला अजिबात आवडलेली नाही. अभिनेत्रीने एन्टटेन्मेंट वेबसाइट पिंकविलाच्या हवाल्याने एक स्टेटमेंट जारी केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, 'कंगनावर विश्वास ठेवणे कठीण जाते असे सोनम कशी बोलू शकते, याचा अर्थ काय होतो. जेव्हा मी माझी 'मी टू' स्टोरी शेअर करत आहे तर मला जज करण्याचा अधिकार कुणी दिला. सोनम कपूरजवळ लोकांवर विश्वास ठेवणे किंवा न ठेवण्याचे लायसेन्स आहे का?'

 

सोनम चांगली अभिनेत्री नाही 
कंगना पुढे म्हणाली - 'तिला माझ्या आरोपांवर विश्वास का नाही. मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. मी अनेक इंटरनॅशनल सब्मिटमध्ये युवा प्रेरणाच्या रुपात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मी माझ्या वडिलांमुळे ओळखली जात नाही. एक दशक संघर्ष करुन मी ओळख बनवली आहे. ती तर चांगली अभिनेत्री नाही आणि चांगली वक्तासुध्दा नाही.'

 

कंगनाने उलगडले रहस्य 
कंगनाने नुकतेच सेक्सुअल हरॅशमेंटची बळी ठरलेल्या महिलेच्या बाजूने व्यक्तव्य केले. यामध्ये ती म्हणाली की, "मला त्या पीडितेवर पुर्णपणे विश्वास आहे. विकासने 2014 मध्ये लग्न केले होते. आम्ही 'क्वीन' चित्रपटाची शूटिंग करत होतो, तेव्हा विकास विवाहित होता. तरीही तो रोज नवीन पार्टनरसोबत शारीरिक संबंध बनवण्याचा उल्लेख करायचा."
- कंगनाने सांगितले की,"मी लोकांना जज करत नाही, त्यांच्या लग्नालाही जज करत नाही. परंतु एक सवय आजार बनतो, तेव्हा आपण असे बोलतो. विकास रोज रात्री पार्टी करायचा. मलाही म्हणायचा."
- "विकास त्या काळात माझ्या जवळ हरियाणाची गोल्ड मेडलिस्टवर तयार होत असलेल्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आला होते. परंतु जेव्हा मी या पीडितेला सपोर्ट केला, तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले."
- कंगना आणि विकासच्या 'क्वीन' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट डायरेक्शन, बेस्ट फिल्म, बेस्ट बॅकग्राउंड स्कोर, बेस्ट एडिटिंग आणि बेस्ट सिनेमाटोग्राफी या अवॉर्डचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्यावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका महिलेला हे सर्व झेलावे लागत होते.


हे आहे पुर्ण प्रकरण 
- 'फँटम फिल्म'च्या महिला कर्मचारीचा आरोप होता की, 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रमोशनल टूर दरम्यान विकासने तिच्यासोबत छेडछाड केली होती. 
- त्या महिलेने सांगितले की, "5 मे, 2015 ला विकासने मला माझ्या हॉटेलच्या रुमपर्यंत सोडू का असे विचारले. यानंतर माझ्यासोबत गैरव्यवहार केला. विकासने मला ड्रॉप करण्याचे विचारले तेव्हा मी नकार दिला. पण तरीही त्याने मला पुन्हा सोबत येण्यार असे सांगितले."
- "आम्ही रुमपर्यंत पोहोचलो तेव्हा मी धावत बाथरुमकडे गेले. मी बाहेर आले तेव्हा पाहिले तर ते माझ्या बेडवर झोपला होता. मी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. महिलेने सांगितले की, तिने याची तक्रार डायरेक्टर अनुराग कश्यपकडेही केली. परंतु काहीच रिअॅक्शन आली नाही. मी जोपर्यंत कंपनी सोडली नाही, तोपर्यंत माझे सेक्शुअल हरॅशमेंट सुरु होते." फँटम फिल्म्समध्ये बहल पहिले अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंतेनाचा पार्टनर होता. आता फँटम फिल्म बंद झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...