आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे तर ‘खाकी’तील गुंडच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कनगरा (उस्मानाबाद) येथे पोलिसांनी गावात दारूबंदीचा आग्रह धरणार्‍या महिला आणि पुरुषांना घरात घुसून अमानुष मारहाण केली. गावात दारूबंदीची मागणी करणे गुन्हा आहे का ? कायद्याचे रक्षक असे भक्षकासारखे वागत असतील तर जनतेने कोणते पाऊल उचलणे अपेक्षित आहे? अशा पोलिसांबद्दल कोणाला तरी सहानुभूती वाटेल का ? सर्वप्रथम त्यांना माणूस म्हणून माणसाशी कसे वागावे याचे प्रशिक्षण द्यावे, तर कुठे डोक्यात प्रकाश पडला तर पडला. गुंडांची भलावण करण्याचा हा आदर्श नैतिकता, संयमाचे उपदेश करत फिरणार्‍या राज्याच्या गृहमंत्र्यांना मान्य आहे का ? पोलिसांनी महिलांना अमानुषपणे मारहाण केल्याने महाराष्ट्रात उस्मानाबाद पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षांनी वरिष्ट पोलिस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. ती योग्य आहे.