आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
कॅलिफोर्निया - उंदराचा मृत्यूचा दाढेतून बाहेर पडण्याचा एक वीडिओ समोर आला आहे. वीडिओमध्ये एक साप उंदराची शिकार करण्यासाठी दडून बसला होता. त्याने अचानकपणे उंदारवर हल्ला चढवतो. पण उंदराला वेळीच संकटाची जाणीव होते आणि तो उडी मारून कुंग फू स्टाइलने सापाला लाथ मारतो. दोन तीनवेळा साप त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो पण उंदीर आपले प्राण वाचविण्यात यशस्वी होतो. रिसर्चर्सनी हा वीडिओ युट्यूबवर शेअर केला आहे.
सापापेक्षाही चपळ असतात कांगारू उंदीर
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ रिवरसाइडर आणि डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी बायोलॉजिकल जर्नलच्या आधारे हा वीडिओ जारी केला आहे. रिसर्चर्सना जाणून घ्यायचे आहे की, कांगारू उंदीर सापाच्या विषापासून कशाप्रकारे आपला बचाव करतात. यासाठी त्यांनी उंदाराचा ब्लड टेस्ट देखील केला होता. नंतर याला रेकॉर्ड करण्यासाठी वाळवंटात हाय स्पीड नाईट व्हिजन कॅमेरे ठेवण्यात आले. यानंतर कॅमेरात कैद झाले रोमांचक दृष्य...
कांगारू उंदीर म्हणजे काय ?
कांगारू उंदीर एक असा जीव आहे तो पूर्णपणे उंदीरही नाही आणि कांगारुही नाही. याचा आकार उंदरासारखा असतो. पण हा कांगारूसारखा हवेत उड्या मारू शकतो. कांगारू उंदीर सापांपेक्षा चपळ असतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.