आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरदस्त आहे कंगना आणि राजकुमारचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर, मर्डर मिस्ट्रीमध्ये आहे काॅमेडीचा तडका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सतत वादांमध्ये असणारी कंगना रनोट आणि राजकुमार राव यांचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर मंगळवार 2 जुलैला रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा कंगनाचा व्हर्सटाईल आणि राजकुमारचा इंटेन्स परफॉर्मन्स पाहायला मिळतो. प्रकाश कोवेलामुदी यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 26 जुलैला रिलीज होणार आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

 

कॉमेडीमध्ये आहे मर्डर मिस्ट्री... 
थोडे सिमरनशी मिळते जुळते कॉमेडीने भरलेले तर आहेच, पण यामध्ये अनेक ठिकाणी व्हेरिएशन दिसते. कंगनाने जेथे कॉमेडी केली आहे, तसेच डायलॉग बोलतानाही आपली प्रतिभा दाखवली आहे. कंगनासोबत राजकुमारनेही आपला रोल खूप उत्तम पद्धतीने साकारला आहे. ट्रेलरमध्ये राजकुमारचे अनेक असे सीन आहेत ज्यामध्ये त्याची इंटेन्स अॅक्टिंग दिसली आहे. कॉमेडीने भरपूर या कथेमध्ये मर्डर मिस्ट्रीमुळे उत्सुकता वाढते.  

 

टंग-ट्विस्टर करतील कमाल... 
ट्रेलरमध्ये एक सीन आहे, जेथे राजकुमार कंगनाला पाहून एक टंग ट्विस्टर बोलतो. ज्यामध्ये तो म्हणतो, 'जिस डाली पर मैंने नजर डाली, वो डाली किसी ने काट डाली.' कनिका ढिल्लोने चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. ज्यामध्ये शब्दांद्वारे ह्यूमर क्रिएट केला गेला आहे.