आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 कोटींचा मनालीमध्ये आलीशान बंगला तर मुंबईमध्ये आहे 15 कोटीचे 5 बेडरूमचे घर, मर्सडीज, मिनी कूपर अशा ब्रँडेड कारची मालकिनही आहे कंगना रनोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोट 32 वर्षांची झाली आहे. 23 मार्च, 1987 ला हिमाचल प्रदेशच्या भांबलामध्ये जन्मलेल्या कंगनाने 13 वर्षांपूर्वी 2006 मध्ये फिल्म 'गँगस्टर' ने बॉलिवूड डेब्यू दिला होता. ही फिल्म यशस्वी ठरली आणि कंगनाला त्यांनंतर बरेच चित्रपट मिळाले. त्यानंतर तिने, वन्स अपॉन टाइम इन मुंबई, तनु वेड्स मनु, क्रिश-3, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि मणिकर्णिका अशा हिट फिल्ममध्ये काम केले. कंगनाने आताच रिलीज झालेल्या फिल्म मणिकर्णिकासाठी 11 कोटी रुपये फीस म्हणून घेतले.  

84 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकिन आहे कंगना...
वेबसाइट finapp.co.in च्या रिपोर्टनुसार, कंगना रनोट सध्या 12 मिलियन डॉलर म्हणजेच 84 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकिन आहे. कंगनाकडे मुंबईमध्ये एक लग्जरी घर आहे, जे तिने 2015 मध्ये खरेदी केले आहे. या घराची किंमत 15.5 कोटी रुपये आहे आणि यामध्ये 5 बेडरूम आहेत. कंगनाच्या या नवीन घराची किंमत 30 कोटी रुपये आहे. तिने या घरासाठी 10 कोटींची जमीन खरेदी केली होती. त्यानंतर 20 कोटी रुपये खर्च करुन आलीशान घर उभे केले. या लग्झरी बंगल्यात एकुण आठ रुम आहेत. याशिवाय डायनिंग रूम, फायर प्लेस, जिम आणि एक योगा रुम आहे. हा बांगला विंटेज स्टाइलमध्ये तयार केलेला आहे. कंगनाचे मुंबईमध्येही 5 बेडरूमचे एक घर आहे. कंगना आज कोट्यवधींची मालकिन आहे आणि हे पैसे तिने आपल्या मेहनतीने कमवले आहे. 

कंगनाकडे आहे 3.5 कोटींच्या कार...
कंगनाकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे मर्सडीज बेंज, मिनी कूपर आणि ऑडी सारख्या लग्जरी ब्रांडच्या कार आहेत. त्यांची किंमत सुमारे 3.5 कोटींच्या आसपास आहेत. कंगना चित्रपटांव्यतिरिक्त ब्रांड एंडोर्समेंटनेही कमाई करते. 

स्वतःचे प्रोडक्शन हाउसदेखील आहे...
रिपोर्ट्सनुसार, कंगनाचे स्वतःचे प्रोडक्शन हाउसदेखील आहे, ज्याचे नाव 'मणकर्णिका फिल्म्स' आहे. याचे ऑफिस पाली हिलच्या नरगिस दत्त रोडवर एका थ्री स्टोरी बिल्डिंगमध्ये आहे.  त्याची किंमत सुमारे 20 कोटींच्या आसपास आहे. 

कंगना रनोटचे फॅमिली बॅकग्राऊंड...
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिझनेसमन आहेत, तर आई आशा रनोट शिक्षिका आहेत. कंगनाला एक थोरली बहीण असून तिचे नाव रंगोली आहे. रंगोली कंगनाची मॅनेजर असून तिचे व्यावसायिक काम ती सांभाळते. एकतर्फी प्रेमातून रंगोलीवर अॅसिड हल्ला झाला होता. कंगना आणि रंगोलीचा एक धाकटा भाऊ असून अक्षत रनोट हे त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...