आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोट आणि मधून भंडारकरसह 61 सेलिब्रिटींनी मोदींच्या समर्थनार्थ लिहीले पत्र, त्या 49 जणांच्या पत्राला दिले उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशभरात जमावाकडून होणारी मारहाण आणि हत्यांच्या वाढत्या प्रकरणामुळे चित्रपट सृष्टीत परत एकदा दोन गट पडले आहेत. 23 जुलै ला 49 दिग्गजांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मॉब लिंचींगविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आज कंगणा रनोट, दिग्दर्शक मधूर भांडारकर, प्रसून जोशी यांच्यासह 61 कलाकारांनी खुले पत्र लिहून मॉब लिंचींगचे मर्यादित आणि खोटे चित्र उभे केल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामाबद्दल पाठिंबाही दिला आहे.


गुरुवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील 49 व्यक्तींनी देशात राजकीय असहिष्णुता आणि धार्मिक वातावरण वाढून मॉब लिचींगच्या घटना वाढत असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच या घटनांचा फक्त निषेध करुन प्रश्न सुटणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले होते. अभिनेत्री अपर्णा सेन, दिग्दर्शन अनुराग कश्यप, इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा यांच्यासह 49 जणांनी ते पत्र लिहिले होते. याउलट आता कंगणा रनोटसह 61 जणांनी असे काहीही होत नसून संबंधित 49 लोक देशाची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.

 


मॉब लिंचींगवर या नव्या पत्रात म्हटले आहे, "पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ सबका विकास, सबका विश्वास' या घोषणे प्रमाणे काम केले आहे. अशा घटनांचा पंतप्रधान मोदींनी सार्वजनिकरीत्या निषेध केला आहे. 23 जुलै 2019 रोजी स्वयंघोषित रक्षक आणि विवेकाचे रक्षक असलेल्या 49 जणांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र वाचून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी परत एकदा काळजी व्यक्त केली आहे. यातून त्यांचा राजकीय हेतू आणि दुटप्पीपणाच दिसून येतो."