आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाने केला अंडरगारमेंटविना फोटोशूट करून घेतल्याचा आरोप, भडकलेल्या डायरेक्टरने दिली धमकी - माझ्यासोबत खेळू नको, नाहीतर माझ्याकडे खूपकाही आहे खेळण्यासाठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोटच्या आरोपांमुळे भडकलेल्या डायरेक्टर-प्रोड्यूसर पहलाज निहलानीने तिला वाद न घालण्याची ताकीद दिली आहे. पहलाजने एक इंटरव्यूदरम्यान सांगितले, "तिने माझ्यासोबत खेळायला नको, पण माझ्याकडे तुझ्यासोबत खेळण्यासाठी खूपकाही आहे." झाले असे की, कंगनाने आरोप केला आहे की, करियरच्या सुरुवातीला पहलाजने तिला पॉर्न फिल्म 'आय लव्ह यू बॉस' ऑफर केली होती आणि यासाठी तिचे साटनच्या बाथरोबमध्ये अंडरगारमेंटविना फोटोशूटदेखील करून घेतले होते. मात्र ती हे शूटिंग मध्येच सोडून पळून गेली होती.  

पहलाज म्हणाले, 'ती पॉर्न फिल्म नव्हती...'
पहलाजने कंगनावर पलटवार करत म्हणाले, "मी ऍडव्हर्टायझिंग फोटोशूट आणि तीन गाण्यांवर दीड कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळे तिला महेश भट्ट यांची फिल्म 'गँगस्टर' मिळाली. 'गँगस्टर' साठी तिने माझी फिल्म सोडली. आमची तीन चित्रपटांसाठी डील होती." निहलानीने पुढे सांगितले, "ती (आय लव्ह यू बॉस) एक यूथ फिल्म होती. फिल्ममध्ये तिची भूमिका लग्न झालेल्या महिलेची होती. यासाठी मी अमिताभ बच्चन यांना अप्रोच केले. फिल्मची गोष्ट 'चीनी कम' च्या लाइनवर होती. मी अमितजींना गोष्टही ऐकवली. पण ते यासारखेच कोणतेतरी दुसरे प्रोजेक्ट करत होते, त्यामुळे माझी फिल्म करायला त्यांनी नकार दिला. ही पॉर्न फिल्म नव्हती आणि मला अशा प्रकारच्या फिल्म बनवण्यात काहीही इंटरेस्ट नाही."

कंगनाने ऐकवली होती कहाणी... 
- कंगनाने मिड डेला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते, "पहलाज निहलानीने मला एक फिल्म ऑफर केली, ज्याचे नाव होते 'आय लव्ह यू बॉस'. यासाठी त्याने माझे एक फोटोशूट करायला सांगितले. जेव्हा मी फोटोशूटसाठी तिथे गेले तेव्हा त्या लोकांनी मला एक सॅटिनचा बाथरोब घालण्यासाठी दिला, तेही विना अंडर गारमेंट्सचा. मला फिल्ममध्ये एका तरुण मुलीचा रोल करायचा होता, जी आपल्या बॉसवर प्रेम करते. ती एका प्रकारची सॉफ्ट पॉर्न फिल्मच होती.'
- कंगनाने पुढे सांगितले, 'मी फोटोशूट केले होते, पण मग मी हे प्रोजेक्ट सोडून दिले. त्यानंतर मी गायब झाले होते. मी एवढी घाबरले होते की, मी माझा फोन नंबरदेखील बदलला होता. कारण मला वाटले होते की, ही फिल्म माझ्यासाठी योग्य नाही." कंगनानुसार, तिला क्लीवेज दाखवणे किंवा असे सीन देण्यात काही हरकत नाहीये. पण त्यावेळी तिच्यासाठी ती फिल्म योग्य नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...