आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangna Will Have To Pay Due To The Controversy With Reporters, No Media Coverage For 'Judgmental Hai Kya'

पत्रकारांशी वाद घालणे कंगनाला पडले महागात, 'जजमेंटल है क्या' ला नाही मिळणार कोणतेही मीडिया कव्हरेज 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेलने पूर्ण मीडियाचा अपशब्दांचा वापर करून अपमान केला. मात्र आता हे त्यांना महागात पडणार आहे असे दिसते आहे. गिल्ड ऑफ इंडियाने कंगनाचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' ला पूर्णपणे बायकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेने निर्णय घेतला आहे की, कंगनाला मीडिया कव्हरेज दिले जाणार नाही. कंगनाने आपल्या प्रेस कॉन्फरंसदरम्यान एका पत्रकाराला खूप खरे खोटे ऐकवले होते. यानंतर तिच्या बहिणीनेही मीडियाविरुद्ध ट्विटरवर खूप काही वाईट साईट लिहिले होते. 

 

आता मात्र Entertainment Journalists' Guild of India नावाच्या संस्थेने प्रोड्यूसर एकता कपूरला एक लेटर लिहिले आहे, ज्यामध्ये चित्रपटाला पूर्णपणे बायकॉट करणे आणि कोणतेही मीडिया कव्हरेज दिले जाणार नसल्याबद्दल लिहिले आहे. या लेटरच्या सब्जेक्ट लाइनमध्ये कंगना चा चित्रपट 'जजमेंटल है क्या' च्या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये तिने केलेल्या अनुचित वर्तनाची निंदा करण्याची मागणी केली गेली आहे. लेटरमध्ये लिहिले गेले आहे की, तुमच्या टीमने आम्हाला अंधेरीमध्ये आयोजित तुमचा एक इव्हेन्ट येऊन कव्हर करण्याची रिक्वेस्ट केली होती. या इव्हेन्टमध्ये कंगना रनोट जी राजकुमार रावसोबत होती, आमच्या एका पत्रकारावर खूप भडकली. जेव्हा की, त्याचा प्रश्न पूर्णदेखील झाला नव्हता. 

 

लेटरमध्ये हेदेखील लिहिले गेले आहे की, कारण तुम्ही त्या इव्हेंटमध्ये स्वतः उपस्थित होत्या तर निश्चितच तुम्हाला हे पूर्ण प्रकरण चांगलेच माहित आहे. आम्हाला या प्रकरणी तुमच्याकडून एक लिखित स्टेटमेंट आणि कंगनाने केलेल्या वर्तनाची निंदा करण्याची मागणी करत आहोत. 

 

 

काय होते पूर्ण प्रकरण ? 
कंगना म्हणाली, "जस्टिन तू तर आमचा शत्रू बनला आहे यार. खूप वाईट गोष्टी लिहीत आहेस. किती जास्त घाणेरड्या गोष्टी लिहीत आहेस. इतका घाणेरडा विचार कसा करतो." झाले असे की, कंगनाने आरोप केला होता की, जस्टिन तिच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी लिहीत आहे आणि तुकाने 'मणिकर्णिका'च्या रिलीजदरम्यानही चित्रपटाबद्दल वाईट लिहिले होते. जेव्हा पत्रकाराने तिला मध्येच टोकले आणि म्हणाला की, त्याच्यावर असे आरोप करणे उचित नाही तर कंगना म्हणाली, "पण मग तुझ्यासाठी असे करणे उचित आहे का ?" कंगना पुढे म्हणाली, "तू म्हणालास कि मी जिंगोस्टिक महिला आहे, जिने मणिकर्णिका बनवला आहे. राष्ट्रवादावर चित्रपट बनवून मी काही चूक केली का ?"

 

रांगोलीनेही ट्विट करून केला पत्रकारांचा अपमान... 
रंगोलीने ट्विटरवर लिहिले, ' एका गोष्टीचे वचन देते, कंगना माफी तर मागणारच नाही, या विकाऊ, नंगे, देशद्रोही, देशाच्या दलाल मीडियावाल्यांना, पण ती तुम्हाला धुवून धुवून सरळ नक्कीच करेल. पाहात राहा तुम्ही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे माफीची मागणी केली आहे.'

बातम्या आणखी आहेत...