आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी प्रश्न : कलम ३७० हटले त्याबद्दल काय? कन्हैयाकुमार - 370 हटले; मोकाट कुत्री कधी हटणार?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशात पाणी, रस्त्याची समस्या आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या अाहे. तरीही उमेदवार स्थानिक प्रश्नांवर बोलत नाही. भावनिक प्रश्नांवर मते लाटणे, हेच उद्योग केले जाताहेत. होय, ३७० कलम हटले, पण अाता मोकाट कुत्री कधी हटणार..? याचे उत्तर हवे अाहे. त्यावर भाजप नेते का बोलत नाहीत..? असा सवाल युवा नेते डाॅ. कन्हैयाकुमार यांनी विचारला. 'दिव्य मराठी'कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्य संपादक संजय आवटे यांनी कन्हैयाकुमार यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.


प्रश्न : देशभक्तीचा माहौल असताना तुम्हाला देशद्रोही का ठरवले जाते?

उत
्तर : गोडसेवादी गांधीवादी झालेत. संविधानविरोधी संविधानाची शपथ घेऊन संसदेत बसतात. विविधतेत एकतेची नव्हे, तर फक्त एक नेता, एक पक्ष, एकाच संस्कृतीचे गोडवे गायले जात आहे. शेती करणे ही शेतकऱ्याची राष्ट्रभक्ती आहे. सुरक्षा देणे ही सैनिकाची राष्ट्रभक्ती आहे. पण या संकल्पनेला बगल दिली जात आहे. संस्कृतीच्या ठेकेदारांनी राष्ट्रभक्तीची व्याख्याच बदलली आहे. देशद्रोही सत्तेत आहेत. मुलभूत प्रश्नांवर बोलणारे देशद्रोही ठरवले जात आहेत.


प्रश्न : ३७० कलम महत्वाचे नाही का..?

उत
्तर : हटले ३७० कलम, पण आता मोकाट कुत्रे कधी हटवणार..? प्रत्येक समस्येचे उत्तर ३७० कलम असे कसे चालेल. भाजपच्या ४२० प्रश्नांचे उत्तर फक्त ३७० कलमच आहे का? पाणी नाही आले, पंधरा लाख, २ कोटी रोजगार का नाही दिले..? तर आम्ही ३७० कलम हटवले असे बोलून मुख्य मुद्यांवरून लक्ष विचलित करताहेत.


प्रश्न : तुम्ही निवडणूक का हरलात..?

उत
्तर : ट्रिपल तलाक हटवणाऱ्या मोदींनी तर यशोदाबेन यांना काहीच न सांगता वाऱ्यावर सोडून दिले, त्याचे काय..? पंतप्रधान स्वत:च समुद्र किनाऱ्यावरील कचरा साफ करताहेत ही चांगली गोष्ट आहे. पण दररोज स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांचे काय? यासाठी वैज्ञानिकांनी का प्रयत्न करू नये?


प्रश्न : पण मत मिळवणे चुकीचे आहे का?

उत
्तर : मी विवेकानंद फक्त वाचत नाहीये, तर त्यांच्या चांगल्या विचारांचे अनुकरणही करतो. मंदिरात वेळ वाया घालण्याऐवजी फुटबॉल खेळा, हा त्यांचा विचार योग्य आहे. रा.स्व. संघाच्या जन्मापूर्वीच भगवा रंग अस्तित्वात आहे. पण याच मुद्यांवर निवडणूका लढवून मते घेणे चुकीचे आहे. तरीही आम्ही जिंकणार आहोत. ब्रिटीशांशी लढताना आम्ही अनेकदा हरलो. पण अखेर जिंकलो.


प्रश्न : ब्रिटीशविरोधी आंदोलनाची तुलना आत्ताच्या परिस्थितीशी करता का?

उत
्तर : प्रश्नच नाही. इंग्रजाच्या विरोधात संघर्ष करून मिळवलेले स्वातंत्र्य आता धोक्यात आहे. विद्यापीठ, न्यूजरूमध्ये, प्रशासनात भितीचे वातावरण आहे. मवाल्यांना का घाबरायचे? एका दिवसात परिस्थिती बदलत नाही. पराभूत होऊन आज विरोधी पक्षात बसलेल्यांनीच, सत्तेत असताना अमित शहांना वाचवले ना. वेळीच शिक्षा दिली असती, तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती.


प्रश्न : डाव्यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे मते विभागतात हे धोकादायक नाही का..?

उत
्तर : मोठ्या पक्षांनीच आमच्यासारख्या छोट्या पक्षांना सोबत घ्यावे. परस्परविरोधी उमेदवार देऊ नये असा प्रयत्न व्हावा. आमची शक्ती कमी असतानाही आम्ही आघाडीच्या प्रयत्नात असतो. शिवाय आम्हाला जागाही कमी हव्या असतात.
फासावर जाणाऱ्या भगतसिंगांना भारतरत्न दिला नाही, माफी मागणाऱ्या सावरकरांना कसा दिला जाऊ शकतो?

मोदीशिवाय नेताच नाही का? आम्ही विश्वसनीयतेवर अाधारित राजकारण करतो. जि.प., पालिका, विधानसभा निवडणुकीतही मोदींनाच आणणार का.? असा प्रश्नही कन्हैयाकुमार यांनी विचारला. महाराष्ट्रातील युवकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी भारतरत्नचा मुद्दा आणला आहे. बेरोजगारीऐवजी सावरकरांचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटतो. पण दुर्देवाने फासावर जाणाऱ्या भगतसिंगांना अद्याप भारतरत्न दिला जात नाही.