आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanpur Case: Police Inspector Video Viral With Taking Bribe Before His Retirement

सात दिवसांनी निवृत्त होणार होता फौजदार, पण अचानक झाला सस्पेंड.. लाच घेताना कॅमेऱ्यामध्ये झाला कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - उत्तर प्रदेशच्या जनपद कानपूर गावातील गजनेर येथील पौजदार प्रेम तिवारीचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी हा फौजदार निवृत्त होत होता. पण त्याआधी 7 दिवसांपूर्वीच त्याने लाच स्वीकारल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरोगाने हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपातील तीन आरोपींची नावे वगळण्यासाठी 35 हजारांची लाच घेतली होती. त्या फौजदाराला पैसे देताना त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला आहे. 


या प्रकरणावर SP राधेश्याम म्हणाले की, प्रेमनारायण तिवारी या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे. त्यांनी हुंड्यासाठी छळाच्या केसमध्ये आरोपींची नावे वगळण्यासाठी पैसे मागितले होते. त्याचा व्हिडिओदेखिल समोर आला असून त्यांना त्यानंतर लगेचच सस्पेंड करण्यात आले आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याचा तपास केला जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...