आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपुर - बुधवारी रात्री उशिरा बीएडच्या विद्यार्थिनीने गर्ल्स हॉस्टेलच्या रूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मैत्रिणींना रूममधून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे त्यांनी वार्डनला बोलावले. सर्वांनी मिळून दरवाजा उघडल्यानंतर विद्यार्थिनी फॅनला लटकलेली होती. ही विद्यार्थी मूळची दिल्लीची राहणारी होती.
बॉयफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर विद्यार्थिनीने उचलले हे पाऊल...
- कानपुरच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणारी कीर्ती सागर (23)डीजी कॉलेजमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती.
- रूम पार्टनर सपना द्विवेदीने दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही सर्वजणी जेवण केल्यानंतर रात्री फिरायला जात असतो. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर मी कीर्तीला बोलावण्यासाठी गेले होते, तेव्हा तिने सांगितले की- यार तुम्ही जाऊन या, माझे बॉयफ्रेंडसोबत खूप भांडण झाले असल्यामुळे मी अप्सेट आहे. त्यानंतर मी बाहेर आले आणि फिरून आल्यानंतर रूम मधून लॉक होती. मी रूम उघडण्याचा प्रयत्न केला परंतु रूममधून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. कीर्तीच्या मोबाइलवर फोन केला परंतु काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही.
- याची सूचना वार्डनला देण्यात आली. सर्वांनी मिळून दार उघडल्यानंतर कीर्ती फॅनला लटकलेली दिसली. हे पाहून मी चक्कर येऊन पडले. मैत्रिणींनी तोंडावर पाणी शिंपडून मला उठवले.
- एसपी सुरेन्द्र दास यांच्यानुसार, प्राथमिक तपासात बॉयफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे, पुढील तपास चालू आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.