आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
कानपुर(उत्तर प्रदेश)- लग्नाचे सगळे पुरावे घेउन मुलगी प्रियकराच्या घराच्या बाहेर बसून राहीली. मुलीचा आरोप आहे की, पोलिसाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शारिरीक संबध बनवले आणि आर्य समाजात जाउन लग्न पण केले. जेव्हा तिने सोबत राहण्याचा हट्ट धरला तेव्हा त्याने तिला मारणे सुरू केले. मंगळवारी प्रेमीका त्या मुलाच्या घरी जाउन बसली. मुलाच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने घराच्या बाहेर काढले. त्यानंतर ती घराच्या बाहेर बसून राहीली आणि तेथून न जाण्याचा हट्ट करू लागली. हा लव ड्रामा पाहण्यासाठी लोकांची त्याठीकाणी गर्दी जमली. मुलीने गोविंद नगर पोलिस ठाण्यात त्या मुला विरूद्ध तक्रार दिली आहे.
7 वर्षापासून चालु होते प्रेम प्रकरण
- गोविंद नगर परिसरातील पोलिस आधीकरी जगरूप सिंह पोलिस विभागात उच्च पदावर आहेत. ते सध्या ईटावा मध्ये पोस्टेड आहेत. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा अर्जुन आणि एक मुलगी आहे.
- प्रियंका (काल्पनिक नाव) चे म्हणने आहे की, मागच्या 7 वर्षापासून तिचे अर्जुन सोबत अफेअर चालु आहे. अर्जुन मर्चेंट नेवीमध्ये नौकरी करतो.
- प्रियंकाने सांगितले, ती छोट्या बहिणी सोबत राहते. आई-वडिलांचा मृत्यु झाला आहे. तिच्यावर छोट्या बहिणीची पण जबाबदारी आहे.
- ती एका खासगी शाळेत शिकवत होती. 2011 मध्ये त्याच शाळेत अर्जुनची छोटी बहिण शिकत होती. तो तिला शाळेत सोडायला आणि घ्यायला यायचा, त्यादरम्यान तो मला म्हणला की, तु माझ्या घरी येउन माझ्या बहिणीला शिकवत जा. त्या दरम्यान आमच्या दोघात जवळीक वाढली.
- 5 वर्षापर्यंत हे असेच चालु राहिले. त्यादरम्यान अर्जुन रात्री दारू पियुन घरी यायचा आणि रात्रभर थांबायचा. त्याने मला लग्नाचे वचन दिले होते.
- खुप प्रयत्नानंतर तो लग्नासाठी तयार झाला. 15 मे 2017 मध्ये आर्य समाजमध्ये आम्ही दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्याने मला घरी पाठवले आणि घरच्यांची समजुत काढुन तुला घरी घेउन जातो असे म्हणाला.
- लग्न होउन आता दिड वर्ष झाले तरिही तो मला घरी घेउन गेला नाही. मी त्याच्याकडे घरी घेउन जाण्याचा हट्ट केला, तर तो म्हणाला- माझ्या घरचे माझ लग्न लाउन देत आहेत, जिथे मला भरपुर हुंडा मिळत आहे. त्यमुळे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.
प्रियकराच्या घरी गेल्यावर तिला धक्का मारून बाहेर काढले
- प्रियंकाने सांगितले की, मंगळवारी मी त्याच्या घरी गेले होते, तेव्हता त्याच्या घरच्यांनी मला धक्के मारून घराच्या बाहेर काढले. तेव्हा पासून मी त्याच्या घराच्या बाहेर बसले आहे.
- गोविंद नगर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर संजीव कान्त मिश्रा यांनी सांगितले की, प्रकरण प्रेमाचे आहे, त्यामुळे मुलीच्या आरोपाची चौकशी केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.