आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanpur Husband Saw Wife In Obscene Condition With Cousin Sister Lesbian Relationship

Shocking: \'मी कामावर गेलो की, पत्नी अन् \'ती\' समलैंगिक संबंध बनवतात,\' त्रस्त पतीची पोलिसांत धाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर(यूपी)  -  यूपीच्या कानपूर जिल्ह्यात समलैंगिक संबंधांचे एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला लेस्बियन असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीचा आरोप आहे की, पत्नी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या चुलत बहिणीशी संबंध बनवते.

 

कामावर घरी आला, तेव्हा आक्षेपार्ह अवस्थेत होत्या दोघी
पतीने पोलिसांना सांगितले की, एका दिवशी ती कामावरून लवकर घरी आला तेव्हा त्याने आपली पत्नी आणि चुलत बहिणीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्याने या गोष्टीवरून दोघांनाही धमकावले आणि समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तक्रारकर्त्याच्या मते त्या दोघींनी त्याला आत्महत्या करण्याची धमकी देऊन गप्प केले.

 

पतीने अखेर पोलिसांत घेतली धाव

आणखी एका रिपोर्टनुसार, ही घटना घरातल्या सर्वांना कळली. सर्वांनी दोन्ही महिलांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या ऐकल्या नाहीत. शेवटी त्रस्त होऊन पती पोलिसांत पोहोचला आणि पोलिसांना त्याने आपबीती ऐकवली. पोलिसांच्या मते, तक्रारकर्त्याचे लग्न 5 महिन्यांपूर्वी फतेहपूरच्या एका तरुणीसोबत झाले होते.

 

दोघीही खुलेपणाने स्वीकारतात संबंध

लग्नाच्या काही दिवसांनीच तिने पतीकडे दुर्लक्ष करणे सुरू केले. दरम्यान, पतीच्या घराजवळच राहणाऱ्या चुलत बहिणीशी तिचे समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले. नुकताच सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधांबद्दल ऐतिहासिक निकाल दिल्यावर दोघीही खुलेपणाने आपले हे संबंध स्वीकारू लागल्या आहेत.

 

कुटुंबीयही त्रस्त

पतीचा आरोप आहे की, तो जेव्हा कामावर जातो तेव्हा त्याची पत्नी त्याच्या चुलत बहिणीसोबत समलैंगिक संबंध बनवते. ती त्याच्यासोबतच राहत आहे. या दोघींचे हे संबंध परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत. या सर्वांमुळे त्रस्त असलेले कुटुंबीय आता त्यांचा सामाजिक बहिष्कार करणार असल्याचे म्हणत आहेत.

 

काय म्हणतात पोलिस?

कानपूरचे एसपी (रुरल) प्रद्युम्न सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. शहर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी समलैंगिकतेवर आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयावरून कायदेशीर सल्ला घेतला जाईल. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी माहिती...  

 

 

बातम्या आणखी आहेत...