आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanpur News Sub Inspector Minor Daughter Gang Repad Main Accused Is Inspector Son

सब इन्स्पेक्टरच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ख्रिसमसच्या पार्टीसाठी बोलावून लुटली अब्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (यूपी) - उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातून सामूहिक बलात्काराची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे बीटेकच्या काही विद्यार्थ्यांनी एका सब इन्स्पेक्टरच्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवले. घटनेनंतर अत्यवस्थ मुलीला एका पोलिस स्टेशनजवळ सोडून फरार झाले. नंतर नातेवाइकांनी पीडितेला उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

असे आहे प्रकरण...
ही लज्जास्पद घटना कानपूरच्या गीतानगर परिसरातील आहे. येथे अनुराग यादव नावाचा बीटेकचा विद्यार्थी आपल्या इतर 3 सहकाऱ्यांसोबत आभा अपार्टमेंटमध्ये किरायाच्या फ्लॅटमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची मैत्री बाबूपुरवा परिसरातील एका सब इन्स्पेक्टरच्या मुलीसोबत झाली होती. ख्रिसमसच्या दिवशी अनुरागने त्या अल्पवयीन मुलीला पार्टीत येण्यासाठी आपल्या फ्लॅटवर बोलावले.

निमंत्रण भेटल्यावर मुलगी आभा अपार्टमेंटमधील अनुरागच्या फ्लॅटवर गेली. आधी थोडा वेळा खाणे-पिणे, नाचगाणे होत राहिले. यादरम्यान अनुरागने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीला एका रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर अनुरागचे मित्र शुभम यादव, अभिषेक कुमार आणि जॅकी दुबे यांनीही आळीपाळीने मुलीला वासनेची शिकार बनवले.

 

मुलीची प्रकृती चिंताजनक
या घटनेनंतर पीडितेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. हे पाहून चारही आरोपी घाबरले आहे. आणि मुलीला बाइकवरून बाबूपुरवा पोलिस स्टेशनसमोर घेऊन गेले. तेथे तिला सोडून सर्व फरार झाले. मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना आपली आपबीती सांगितली. तिचे बोलणे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी ताबडतोब मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

 

आरोपींमध्ये पोलिसांची मुले
यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून चार आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध काकादेव पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या फ्लॅटवर धाड टाकून त्यांना अटक केली. चौकशीत खुलासा झाला की, मुख्य आरोपी अनुराग पोलिस इन्स्पेक्टर अवधेश यादवचा मुलगा आहे. तो मूळचा जौनपूरच्या गुनौली परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांची सध्या देवरिया जिल्ह्यात पोस्टिंग आहे.

दुसरीकडे, दुसरा आरोपी अभिषेक हाही पोलिस इन्स्पेक्टर रवींद्र कुमार यांचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांची सध्या काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी येथे पोस्टिंग आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासोबतच घटनास्थळावरून एक शर्ट आणि रक्ताने माखलेली चादर हस्तगत केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपींची चौकशी सुरू आहे. तपासानंतर सर्वांना तुरुंगात डांबण्यात येईल.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...