आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कन्या आजचे राशिभविष्य 22 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 22 Aug 2018

22 Aug 2018, कन्या राशिफळ : जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे कन्या राशिफळ (22 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक कोणाचीही मन दुखणारही नाही अशा स्वभावाचे असतात परंतु आज तुमची एखादी गोष्टी एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुम्ही प्रामाणिकपणे काम पूर्ण कराल. आज तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - तुमचे लक्ष कौटुंबीक बाबींकडे असेल. रोजच्या कामाशिवाय इतर अनेक कामे समोर असतील. त्यातील काही कौटुंबीक कर काही बाहेरची कामे असतील. एखाद्याच्या मदतीची संधी मिळेल. त्यामुळे समाधान मिळेल. एखाद्या गरीब व्यक्तीबाबत फार काळ खोलवर विचार करत राहाल. नात्यांच्या बाबतीत सर्वकाही सुरळीत राहील. प्रियकराबरोबरच इतर काही किरकोळ बाबी समोर येऊ शकतात. 


निगेटिव्ह - स्वतःवर नियंत्रण ठेवा. गोपनीय बाबी कोणाबरोबरही शेअर करू नका. वेळ थोडी प्रतिकूल असू शकते. तुमचे एखादे कामही थांबेल. भाऊ, मित्रांकडून मदत न मिळाल्याने मूड खराब होऊ शकतो. एखाद्या कामात बेजबाबदारपणा केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक बाबींवरही खर्च अधिक होऊ शकतो. अनावश्यक गोष्टींमुळे मन विचलित होऊ शकते. सावध राहायला हवे. 


काय करावे - एखाद्या अपंग व्यक्तीला बिस्कीट किंवा दुसरे काहीतरी खायला द्या. 

लव्ह - तुम्ही तुमच्या भावना आज व्यक्त करू शकता. संबंध अधिक मजबूत होतील. पार्टनरला न सांगता तुमच्या मनातले समजेल. तुमच्यातील प्रेमही वाढेल. 


करिअर - पैशांच्या अडचणीत गुंतून राहाल. व्यवसायात अनिश्चितता असेल. विद्यार्थ्यांसाठी नकारात्मक वेळ असेल. स्वतःच्या परिश्रमावर लक्ष असू द्या या राशीच्या काही विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावा लागेल. 


हेल्थ - जुनाट आजार पुन्हा एकदा त्रास देऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...