Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 1 Sep 2018

कन्या राशी : 1 Sep 2018: जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Today Virgo Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • कन्या आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 1 Sep 2018
    1 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - सहकाऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. जेवढे मोठे मन ठेवाल तेवढ्या अडचणी कमी होतील. कौटुंबीक संबंधांना अधिक महत्त्व द्याल. अविवाहितांना एखादा विवाहाचा प्रस्तावही मिळू शकतो. एखादा मित्र किंवा व्यवसायातील भागीदार पैसा कमावण्याची नवी कल्पनाही सांगू शकतो. आई वडिलांपासून दूर राहत असाल तर घरी जाण्याचा योग आहे.


    निगेटिव्ह - कोणतीही जबाबदारी बळजबरी डोक्यावर घेतल्याच अडचणी वाढू शकतात. त्यामुळे तुमचा तणावही वाढू शकतो. चंद्र गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानी आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडथळा येऊ शकतो. कामाचा ताणही वाढू शकतो. काही प्रकरणांत तुमची भूमिका अडचणीची ठरू शकते. सावध राहावे लागेल. प्रवासावर जास्त खर्च होऊ शकतो. एखाद्या अडचणीत अडकल्यानंतर गुंता अधिक वाढू शकतो. सावध राहा. तुमच्यावर खोटे खारोपही लागू शकतात. भावांचे सहकार्य मिळाले नाही तर त्रास होऊ शकतो.


    काय कराल - पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.

    लव्ह - पार्टनरच्या संशयाला बळी पडू शकता. जराही खोटं बोलू नका अन्यथा नुकसान होऊ शकते.


    करीअर - तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. अधिकारी किंवा मोठ्या लोकांच्या भेटी होतील. काही कामे खोळंबल्याने मूड खराब राहील.


    हेल्थ - जुन्या आजारांनी त्रस्त राहू शकता. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्याकडेही लक्ष ठेवा.

Trending