Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | kapalbhati-will-reduce-weight

कपालभातीमुळे लठ्ठपणा होतो कमी

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 01:14 PM IST

योगविद्येतीलच एक असलेल्या कपालभातीमुळे लठ्ठपणा कमी करता येतो

 • kapalbhati-will-reduce-weight

  अव्यवस्थित दिनक्रम आणि असंतुलित खाण्यामुळे अनेक लोकांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. लठ्ठपणामुळे कोणतातरी मोठा आजार जडण्याची टांगती तलवार सतत आपल्या डोक्यावर असते. लठ्ठपणा लवकरात लवकर कमी करण्यासाठी योगविद्येचा उपयोग केला जाऊ शकतो. योगविद्येतीलच एक असलेल्या कपालभातीमुळे लठ्ठपणा कमी करता येतो.

  कपालभाती कशा पद्धतीने करावी...

  सपाट पृष्ठभागावर एखादे कापडी आसन टाकून त्यावर आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने बसावे. बसल्यानंतर पोटाला हलके सोडावे. त्यानंतर जोरात श्वास घेऊन पोट आत ओढून घ्यावे. श्वास सोडण्यात आणि पोट पूर्वपदावर आणण्यात एक लय आणावी. सुरवातीला ही क्रिया दहा वेळा करावी. नंतर त्यामध्ये ६० पर्यंत वाढ करावी. ही क्रिया करताना थोड्या-थोड्या अंतराने विश्रांती घेता येऊ शकते. या क्रियेमुळे बरगड्यांच्या खाली साठून राहिलेली हवा किंवा कार्बन डाय ऑक्साईड बाहेर काढता येतो आणि पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.

  कपालभाती करण्यापूर्वी...

  श्वासाचा आजार असलेल्या व्यक्तीने ही क्रिया करू नये.

  कपालभाती केवळ पहाटेच्यावेळी पोट रिकामे असतानाच करावी.

  योगविद्येचा अभ्यास असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार ही क्रिया करावी.

Trending