आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Kaneet Wedding: कपिल-गिन्नीच्या लग्नासाठी क्लब कबानामध्ये तयारी सुरु, चीन-इटलीमधून बोलावले शेफ, कपिलला सप्राइज देणार मित्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर| कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. लग्न ग्रँड व्हावे यासाठी सजावटसोबतच खाण्यापिण्याकडे पुर्ण लक्ष दिले जात आहे. सिंगर गुरदास मान, दलेर मेंदीसोबतच जवळपास 800 गेस्ट कपिल आणि गिन्नीच्या लग्नाचे साक्षीदार बनतील. पाहूण्यांच्या सेवेत काहीच कमतरता राहू नये यासाठी पुर्ण प्लानिंग केली जात आहे. कबाना स्पा अँड रिसॉर्ट 12 आणि 13 डिसेंबर, दोन दिवसांसाठी बुक आहे. 7 डिसेंबरला चीनमधून तीन शेफ येतील. जेवणामध्ये चायनीज, इटालियन आणि पंजाबी पदार्थांचा समावेश असेल. इटलीमधून शेफ कबाना पोहोचतील. लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर पुर्ण लक्ष दिले जात आहे.


मेरे यार की शादी है... कपिलचे मित्र लग्न आणि रिसेप्शनमध्ये देणार सप्राइज 
कपिलचे मित्रही या लग्नाची विशेष तयारी करत आहेत. आमच्या वेबसाइटशी बोलताना कपिलच्या कॉलेजच्या मित्रांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. ते म्हणाले की, आम्ही कपिलसाठी खास तयारी करत आहोत.

 

कपिलचा कॉलेज फ्रेंड मनोज म्हणतो की - कपिल खुप डाउन टू अर्थ आहे. कपिलला कुलचे चने खुप आवडतात. डोंगरांमध्ये फिरायला आवडते. तो खुप मेहनती आहे, लग्नाला सहा दिवस बाकी असतानाही तो शूटिंग करतोय. आम्ही कॉलेजच्या काळापासून एकत्र आहोत. त्याचा स्पेशल दिवस अजून स्पेशल बनवण्यासाठी आम्ही सप्राइज प्लान केला आहे. रिसेप्शनला त्याला सप्राइज देऊ.

 

कपिलच्या घरी जागरणमध्ये आम्ही मित्र म्हणून गाऊ: तेजी संधू
तेजी संधूने सांगितले की- तसे तर मी आणि ग्रोवर कपिलचे सीनियर आहोत. पण 1999 पासून आम्ही एकत्र आहोत. आम्ही रिहर्सल करायचो. आम्ही कमी आणि भाऊ जास्त आहोत. कपिलच्या लग्नात तर आम्ही पुर्णपणे मस्ती करणार आहोत. जागरणमध्ये सर्व मिळून गाणार आहोत. 9 आणि 13 ला पार्टी असणार आहे. सर्व मित्र स्वतः गाणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...