आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या लग्नात एन्ट्री घेणे नाही सोपे, पाहुण्यांना दाखवावे लागणार एक स्मार्ट कार्ड त्यानंतरच मिळणार प्रवेश, केवळ बंदोबस्तावर कपिल खर्च करतोय 15 लाख रुपये : Exclusive Details

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहेत. सोमवारी म्हणजे 3 डिसेंबर रोजी गिन्नीच्या घरी अखंड पाठ झाला. या कार्यक्रमातील गिन्नीचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये ती पर्पल कलरच्या शरारामध्ये दिसतेय. कपिल आणि गिन्नी येत्या 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाप्रमाणेच कपिलच्याही लग्नात लोकांना एन्ट्री घेणे सोपे नाही. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना कपिलने लग्नपत्रिकेसोबत पाठवलेले स्मार्ट कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. दीपवीरनेही त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत पाहुण्यांना 'ई-इन्व्हाइट' पाठवले होते. त्यावरील कोड स्कॅन केल्यानंतर पाहुण्यांना एन्ट्री देण्यात आली होती.


- DainikBhaskar.com ला मिळालेल्या माहितीनुसार, कपिलने त्याच्या लग्नात सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच कपिलने त्याच्या मित्र आणि जवळच्या लोकांना लग्नपत्रिका पाठवल्या आहेत. लग्नपत्रिकेसोबत एक स्मार्ट कार्ड अटॅच आहे. कपिलने त्याच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्थेवर 15 लाख रुपयांहून अधिकचा खर्च केला आहे.  


 कपिलने लग्नपत्रिकेसोबत पाठवली मिठाई... 
- कपिलच्या लग्नपत्रिकेचे फोटोज समोर आले आहेत. रेड आणि क्रीम कलरचे कॉम्बिनेशन असलेल्या या पत्रिकेवर शाही महल, हत्ती आणि कमळाचे फूल छापण्यात आले आहे. सोबतच गोल्ड प्लेटेड वर्कही त्यावर करण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे नातेवाईक आणि पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी कपिलने कार्डसोबत मिठाई, ड्राय फ्रुट्स आणि चिक्की पाठवली आहे. 


- कपिल त्याच्या लग्नात खाण्यावर 15 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज डिशेश असतील. लग्नात पंजाबी फूडसह विविध 100 व्यंजन असतील.


- लग्नापूर्वी 10 डिसेंबरला माताचे जागरण होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका आणि कपिलची चांगली मैत्रीण असलेली ऋचा शर्मा माताचे भजन गाणार आहे.


- ऋचाशिवाय पंजाबी भजन गायक मास्टर सलीमही परफॉर्म करणार आहे. 10 तारखेला जागरणानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेंदी आणि कॉकटेल ठेवण्यात आले आहे.


- लग्नाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी पंजाबी गायक आणि अभिनेता गुरदास मान परफॉर्म करणार आहे. कपिलची होणारी पत्नी गिन्नी ही गुरदास मानची मोठी फॅन आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी अमृतसह येथे होणा-या रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी त्यांच्या हिट गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन करेल.


- कपिलची भावी पत्नी गिन्नी चतरथ ही जालंधरच्या गुरुनानक नगर येथे वास्तव्याला आहे. हे ठिकाण कपूरथला चौकाजवळ आहे. त्यामुळे जालंधर येथे लग्न होणार आहे. कबाना रिसॉर्ट आणि स्पा (या क्लबला कबाना नावानेही ओळखले जाते) दोन दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. येथे मेंदी, संगीत, फेरे आणि एक छोटेखानी रिसेप्शन होणार आहे.


- कपिल शर्माने बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींना लग्नात आमंत्रित केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेकांना त्याने लग्नपत्रिका पाठवली आहे. अमिताभ आणि रेखा यांना स्वतः कपिलने आमंत्रित केले आहे. आतापर्यंत 150-200 लोकांची लिस्ट तयार झाली आहे.


- लग्नानंतर 14 डिसेंबर रोजी या कपलचे पहिले रिसेप्शन अमृतसह येथे तर दुसरे रिसेप्शन 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...