आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kapil Sharma And Ginni Reception Will Be Hosted At 4 Venues Including One In Canada

कॅनडासोबतच या 4 ठिकाणी होणार कपिल-गिन्नीची रिसेप्शन पार्टी, 5 ठिकाणी सेलिब्रेशन करणारा पहिलाच सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर | कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ 12 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. या खास दिवसासाठी दोघांचेही कुटूंब तयारी करत आहेत. गिन्नीच्या हरदेव नगर येथे घरात रेनोवेशन सुरु झाले आहे. विशेष म्हणजे बी टाउनमध्ये कोणत्याही सेलिब्रिटीच्या लग्नाचे आतापर्यंत 5 ठिकाणी सेलिब्रेशन झालेले नाही. 


कनाडामध्ये होणार रिसेप्शन पार्टी 
12 डिसेंबरला जालंधरच्या क्लब कबानामध्ये लग्न, त्यानंतर अमृतसर, दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी दिली जाईल. कपिल शर्मा कनाडामध्येही आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाइकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे. बॉलिवूडच्या प्रसिध्द सेलिब्रिटीजलाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. 

 

हिस्ट्रॉनिक्स शिकवताना पडला गिन्नीच्या प्रेमात 
कपिलने 2007 मध्ये एपीजे कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून डिप्लोमा केला तर गिन्नीने एचएमवीमधून बीकॉम आणि पीजीडीसीए केले आहे. यूथ फेस्टिव्हल दरम्यान कपिल शर्मा एचएमवीमध्ये डायरेक्टर थियेटरचे इव्हेंट्सची तयारी करण्यासाठी जात होता. तिथे त्याने 3-4 वर्षे यूथ फेस्टिव्हलची तयारी केली. कपिल आणि गिन्नी पहिली भेट याच दरम्यान झाली होती. गिन्नी वन अॅक्ट प्ले, थियेटर आणि हिस्ट्रॉनिकमध्ये भाग घ्यायची अनेक वेळा ती विजेती ठरली होती. गिन्नीची मेहनत, थियेटरविषयी असणारे प्रेम आणि टॅलेंट कपिलला आवडले. तो गिन्नीच्या प्रेमात पडला. दोघांनी एकत्र 'हस्स बल्लिये' या रियालिटी शोमध्ये भाग घेतला. या दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटूंबानेही सपोर्ट केला. 

बातम्या आणखी आहेत...