आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा झाला गोंडस मुलीचा बाबा, सेलिब्रिटींकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, गुरु रंधावा म्हणाला - मी ऑफिशिअली काका झालो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा बाबा झाला आहे. त्याची पत्नी गिन्नी चतरथने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपिलने ट्वीट करुन ही आनंदाची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच गिन्नी आणि कपिल आईबाबा झाले आहेत. मागील वर्षी 12 डिसेंबर रोजी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते.

मुलीच्या जन्माची बातमी दिल्यानंतर कपिलवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अक्षय कुमार, किकू शारदा, दीया मिर्झा, रकुल प्रित सिंग, गुरु रंधावा, सुरेश रैना, सायना नेहवाल यांच्यासह अनेकांनी कपिल आणि गिन्नीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

एक नजर टाकुयात कपिल आणि गिन्नीच्या लव्ह स्टोरीवर... 

  • 13 वर्षांपूर्वी झाली होती पहिली भेट...

काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कपिलने गिन्नीसोबतच्या त्याच्या भेटीची स्टोरी सांगितली होती.  कपिलने सांगितले होते, 'मी एचएमवी कॉलेज जालंधर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. मी स्कॉलरशिप होल्डर होतो आणि थिएटरमध्ये नॅशनल विनरही राहिलो. ही गोष्ट 2005 ची आहे, जेव्हा मी आईपीजे कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पॉकेट मनीसाठी नाटक दिग्दर्शित करायचो. मी विद्यार्थ्यांचे ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. गिन्नीसुद्धा ऑडिशनसाठी आली होती. हीच आमची पहिली भेट होती. त्यावेळी गिन्नी 19 आणि मी 24 वर्षांचा होतो. मुलींच्या ऑडिशन झाल्यानंतर मी गिन्नीवर इम्प्रेस झालो होतो. मी तिलाच इतर मुलींच्या ऑडिशन घ्यायला सांगितल्या. जेव्हा आम्ही रिहर्सल सुरु केल्या, तेव्हा गिन्नी माझ्यासाठी घरुन जेवण आणत असे. मला सुरुवातीला वाटले की, तिला माझा आदर वाटत असावा म्हणून ती असे करत आहे.' तर गिन्नीने मुलाखतीत सांगितले होते, 'कपिलला बघताचक्षणी तो मला आवडला होता. त्यामुळे मी त्याच्यासाठी दररोज जेवण आणत असे. ' कपिलने सांगितले- 'एका मित्राने मला कल्पना दिली होती की, गिन्नी मला पसंत करतेय. पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी मीच गिन्नीला विचारले की, तू मला पसंत करतेस का तर तिने हो असे उत्तर दिले. '

  • स्वतः केली होती फोन करण्यास मनाई

कपिलने सांगितले- 'गिन्नी माझ्यावर खूप इम्प्रेस झाली होती कारण तिने मला खूप कमी वयात काम करताना पाहिले होते. आमच्यात चांगले ट्युनिंग जुळले होते. मग मी लाफ्टर चॅलेंजच्या ऑडिशनसाठी मुंबईत आलो. पण मला येथे रिजेक्ट करण्यात आले होते. मी फोनवर गिन्नीला म्हटले की, यापुढे मला कधीही फोन करु नकोस. मी तिच्यासोबतची मैत्री तोडली कारण या नात्याचे भविष्यात काहीच होणार नाही, असे मला वाटू लागले होते. मला अपयश आले होते. तिला माझ्यापेक्षा अधिक चांगला आणि कमवता जोडीदार मिळू शकतो, असे मला वाटू लागले होते. मी पुन्हा एकदा लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली. तेव्हा गिन्नीने मला फोन करुन माझे अभिनंदन केले होते.

  • नाकारला होता लग्नाचा प्रस्ताव

कपिलने सांगितले, जेव्हा मी पैसे कमावू लागलो, तेव्हा माझी आई माझ्या लग्नाचा प्रस्ताव गिन्नीच्या घरी घेऊन गेली होती. पण तिच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मी पुन्हा एकदा माझ्या कामात बिझी झालो आणि माझे एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले. मी मुंबईत सेटल झालो आणि माझे आयुष्य बरेच बदलले. आयुष्यात एवढे चढउतार आले, पण ही मुलगी कधीही डगमगली नाही. एवढा पेशन्स मी कुणातही पाहिला नव्हता. त्यामुळे गिन्नीच माझ्यासाठी योग्य जोडीदार असल्याचे मला वाटले. जेव्हा पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात चढउतार आले, तेव्हा मी हाच काळ लग्नासाठी योग्य असल्याचे मला वाटले.

बातम्या आणखी आहेत...