आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kapil Sharma And Sunil Grover Reunite Due To Salman Khan, Seen Together In Sohail Khan's Birthday Party

सलमानने करून दिली कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरची मैत्री, सोहेलच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसले दोघे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कॉमेडीचे दोन प्रसिद्ध कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडण संपलेले दिसत आहे. आले असे की, कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर सुनील ग्रोवर आणि सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोहेल खानच्या बर्थडे पार्टीमधील आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कपिलने लिहिले, 'ब्रदर्स नाइट.' ज्याने हे स्पष्ट होत आहे की, कपिल आणि सुनील यांच्यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही.  

सलमानने करून दिली मैत्री... 


अनेकदा आशा बातम्या येत असतात की, सलमानने कपिल आणि सुनील यांचे पॅच अप करून दिले आहे. पण याचा कोणताही पुरावा समोर येत नव्हता. मात्र कपिलने हा फोटो शेअर केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, लवकरच हे दोघे पुन्हा एकदा सोबत कॉमेडी करताना दिसू शकतात. 

बर्थडेमध्ये पोहोचले सेलिब्रिटी, सलमानने गायले गाणे... 


साेहेलच्या बर्थडेला अनेक सेलिब्रिटी पार्टीमध्ये सामील झाले होते. यादरम्यानच एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान आणि मीका सिंहने गाणे गाऊन सोहेलला बर्थडे विश केले. सोहेलच्या बर्थडेला झालेल्या पार्टीदरम्यान वत्सल सेठ, मंदाना करीमी, नंदिता मथानी, अतुल अग्निहोत्री  सेलिब्रिटी दिसले होते. 

बातम्या आणखी आहेत...