आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माने दिले अक्षय कुमारला आव्हान, म्हणाला - हिंमत असेल तर पहाटे तीन वाजता 'गुड न्यूज'च्या प्रमोशनसाठी ये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क- विनोदवीर कपिल शर्माने बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला एक चॅलेंज दिले आहे.हिंमत असेल तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहाटे तीन वाजता आमच्या शोमध्ये ये, असे कपिल अक्षयला म्हणाला आहे.


झाले असे की, कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम भारती सिंह, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये कपिल ‘शूभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे तीन वाजले आहेत. अक्षय तुला आमचे चॅलेंज आहे... तू गेल्या वेळेस आम्हाला सहा वाजता उठवले होते. आता आम्ही तीन वाजता उठवतो आहोत. हिम्मत असेल तर तीन वाजता शूटसाठी ये. आम्ही जागे आहोत, गुड न्यूजसोबत लवकर ये...’ असे कपिल म्हणाला आहे. तर चंदन प्रभाकरदेखील मी मेकअप करुन तयार असल्याचे अक्षयला सांगतोय. भारतीचाही मजेशीर अंदाज येथे बघायला मिळतोय. 

व्हिडिओत कपिल अक्षयसोबतच्या मागील एपिसोडचा उल्लेख करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी ‘हाऊसफूल 4’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचला होता. चित्रपटाची संपूर्ण टीम त्याच्यासोबत होती. पण या भागाच्या चित्रीकरणासाठी कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला सकाळी सहा वाजता उठून चित्रीकरणची तयारी करावी लागली होती. कपिल आणि त्याची पूर्ण टीम हिप-हिप हुर्रेचे नारे लावताना व्हिडिओत दिसत आहेत. अखेर हे सर्व जण "लव्ह यू अक्षय पाजी... ये भेटुयात..." असे म्हणाले आहेत. लवकरच अक्षय त्याचे सहकलाकार करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीसोबत 'गुड न्यूज'च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.