आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये झाले कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन, पत्नी गिन्नीसोबत दिसला रॉयल लूकमध्ये, दोघांनी घातला होता मॅचिंग ड्रेस 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. कॉमेडियन कपिल शर्माने लग्नाच्या 50 दिवसांनंतर दिल्लीमध्ये शनिवारी रात्री तिसरे रिसेप्शन दिले. रिसेप्शनमध्ये कपिल आणि गिन्नी चतरथ रॉयल लूकमध्ये दिसले. दोघांनीही ब्लू रंगाचा मॅचिंग ड्रेस घातला होता. कपिलने ब्लू कलरची शेरवानी घातली होती, तर गिन्नी ब्लू-गोल्डन रंगाच्या लहेंग्यात दिसली. कपिलने आपल्या जवळच्या लोकांसाठी, राजकारण्यांसाठी आणि खेळ जगतातील मित्रांसाठी हे रिसेप्शन ठेवले होते. पण समोर आलेल्या फोटोमध्ये मोदी दिसले नाही. 


12 डिसेंबरला केले होते लग्न 
- कपिलने बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत 12 डिसेंबरला लग्न केले होते. आपल्या लग्नाच्या लगेच नंतर या कपलने दोन रिसेप्शन ठेवले, पहिले रिसेप्शन अमृतसरमध्ये आणि दूसरे रिसेप्शन मुबईच्या  J.W Marriot मध्ये ठेवण्यात आले होते. रिसेप्शनमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून पंजाबी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडपासून मोठे स्टार्स सामिल झाले होते. 
- दिल्लीमध्ये झालेल्या रिसेप्शनमध्ये क्रिकेटर सुरेश रैना, युवराज सिंह, सिंगर मीका सिंह, सोहेल खान, दलेर मेंदी, हर्षदीप कौरसारखे सेलेब्स पोहोचले होते. यासोबतच पार्टीमध्ये कपिल शर्माचे काही विदेशी फ्रेंड्सही दिसले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...