आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अँग्री बर्ड 2'च्या लीड कॅरेक्टर रेडला कपिल शर्माने दिला आवाज, धर्मेंद्र आणि नाना पाटेकर यांच्या शैलीतही बोलला कपिल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'अँग्री बर्ड्स 2' चे हिंदी व्हर्जन डब केले आहे कपिल शर्मा, कीकू शारदा आणि अर्चना पूरन सिंह यांनी. कपिलने या चित्रपटाच्या लीड कॅरेक्टर रेडला आवाज दिला आहे. त्याने यामध्ये आपल्या आवाजाबरोबर मॉड्यूलेशन करत अभिनेते नाना पाटेकर आणि धर्मेंद्र यांचेही आवाज काढले आहेत. कपिलने पहिल्यांदा एखाद्या कार्टून कॅरेक्टरसाठी डबिंग केले आहे. त्याने कॉमेडीसोबतच कॅरेक्टरची क्यूटनेसदेखील जपली आहे.   
 

आपल्या कॅरेक्टरविषयी बोलला कपिल... 
याबद्दल कपिल म्हणाला, 'इंग्लिश चित्रपट हिंदीमध्ये डब करणे एक खूप मोठे चॅलेंज आहे. कारण हॉलिवूडमध्ये कोणताही अनिमेशन चित्रपट बनण्यापूर्वी त्याचे डबिंग केले जाते आणि नंतर त्याचे ग्राफिक्स शूट केले जातात. त्यामुळे हॉलिवूडमध्ये डबिंग आर्टिस्टसाठी ते सोपे होते, पण आम्हाला ग्राफिक्स पाहून येथे हिंदीमध्ये डब करावे लागते. जे थोडे कठीण असते कारण आम्हला त्या कॅरेक्टरनुसार बोलावे लागते.'
 
कपिलने आपल्या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्यांची नवे काढली आहेत. एक आवाज आहे धर्मेंद्र यांचा तर दुसरा आहे नाना पाटेकर यांचा.  धर्मेन्द्र यांचा आवाज कपिल तेव्हा काढतो जेव्हा त्याच्या कॅरेक्टरला राग येतो. धर्मेन्द्र यांचा आवाज काढण्याबद्दल कपिल म्हणाला, ''धरमजी खूप मोठे व्यक्ती आहेत. त्यांचा आवाज खूप चांगला आहे आणि मी त्यांच्या लेव्हलपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही.''
 
एका ठिकाणी त्याने नाना पाटेकर यांचा आवाज काढला आहे. याबद्दल कपिल म्हणाला, "एक अशी जागा आहे जेव्हा रेडचे कुणीतरी कौतुक करते तेव्हा मी नाना पाटेकर यांच्या आवाजात म्हणाले आहे, 'करो करो तारीफ करो बहुत अच्छा लगता है तारीफ करना.' तर जेव्हा हे माझ्या टीमने हे ऐकले तेव्हा त्यांनाही खूप आवडले. मग त्यांनी विचार केला की, नाना पाटेकर वाला डायलॉग तसाच ठेवला जाईल." 

बातम्या आणखी आहेत...