आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा पत्नी गिन्नीसोबत बेबीमूनसाठी गेला कॅनडात, तेथे घालवणार 10 दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - कॉमेडियन कपिल शर्मा पत्नी गिन्नी चतरथला घेऊन बेबीमूनला गेले आहेत. बुधवारी रात्री दोघांना मुंबई विमातळावर पाहण्यात आले. यावेळी कपिल क्लीन शेव्ह लुकमध्ये दिसून आला. तर गिन्नी ब्लॅक आउटफिटमध्ये बेबी बंप लपवत असल्याचे दिसली. दोघेही दहा दिवसांसाठी कॅनडाला गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार गिन्नी 3-4 महिन्यांची गर्भवती आहे. कपिल आपल्या बिझी शेड्यूलमुळे गिन्नीला वेळ देऊ शकत नव्हता यामुळे त्यांनी बेबीमूनचा प्लॅन केला.  

 

12 डिसेंबर रोजी झाले होते लग्न
12 डिसेंबर 2018 रोजी कपिल बालमैत्रिण गिन्नी चतरथसोबत विवाह बंधनात अडकला होता. लग्नानंतर त्यांनी तत्काळ अमृतसर आणि मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. रिसेप्शनमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून पंजाबी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलीवुडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. दिल्लीतील पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये क्रिकेटर सुरेश रैना, युवराज सिंग, गायक मीका सिंग, सोहेल खान, दलेर मेहंदी, हर्षदीप कौर यांसह कपिलचे विदेशी मित्र सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...