आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माने फोन करून बहिणीची केली गंमत, विचारले \'तू माझीच बहीण आहेस ना?\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विनोदाचा बादशाहा कपिल शर्मा त्याच्या शो'मध्ये प्रत्येकाची छेड काढत असतो. पण शो व्यतिरिक्त त्याच्या वयक्तिक आयुष्यातही आपल्या परिवारातील सदस्यांची टिंगल उडवत असतो. कपिलने नुकतीच त्याच्या सख्ख्या बहिणीची खिल्ली उडवली आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ कपिलने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये कपिल आपली बहीण पूजाला परेशान करतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कपिल पंजाबी अभिनेता गुरप्रीत घुगीच्या आवाजात बहिणीशी बोलत आहे. पण आपल्या भावाच्या खोडकर स्वभावाला ती समजू शकली नाही. अशा परिस्थितीत, "तू कपिल शर्माची सख्खी बहीण आहेस का?" असे विचारले असता या प्रश्नाचे उत्तर होय येताच कपिल म्हणतो, "अशी कशी बहीण आहेस, आपल्या भावचा आवाज देखील ओळखत नाही." कपिलने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये 'सन ऑफ मनजीत सिंग' पंजाबी चित्रपट बनवला आहे ज्यामध्ये गुरप्रीत घुगी हा मुख्य भूमिकेत आहे.

 

लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे कपिल.
>> कपिल शर्मा सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. 12 डिसेंबर रोजी जालंधर येथे प्रेयसी गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

>> लग्नाविषयी सांगताना कपिल म्हणाला, "लग्नसमारंभ 12 डिसेंबरला जालंधर येथे होणार आहे कारण जालंधर गिनीचे मुळ शहर आहे. आम्हाला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचे होते परंतु गिनी त्यांच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांना हे लग्न थाटामाटात करायचे आहे. मी त्यांच्या भावना चांगल्याप्रकारे समजू शकतो, माझ्या आईला सुद्धा माझे लग्न थाटामाटात व्हावे असे वाटते. 

 

बातम्या आणखी आहेत...