आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माचे आयुष्य बदलणा-या दोन गोष्टी एकाच दिवशी आल्या समोर, शेअर केली लग्नाची पत्रिका आणि कॉमेडी शोच्या नवीन सीझनचा प्रोमो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा नवीन शो 'द कपिल शर्मा शो'चा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी हा प्रोमो वेगळ्या अंदाजात सादर करण्यात आला आहे. सोनीने नुकतीच या शोची घोषणा केली असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, हा शो 25 डिसेंबरला ऑन एअर येण्याची शक्यता आहे.

 

कपिलच्या लग्नाची पत्रिकाही आली समोर... 
कपिलने आपली लग्न पत्रिका ट्विटरवर शेअर करत चाहत्यांकडे भावी आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. 12 तारखेला कपिल गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार असून जालंधरमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. 10 तारखेला कपिलच्या बहीणीच्या घरी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून 11 डिसेंबर रोजी जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे.  14 डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.  कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईमध्ये देखील एक पार्टी आयोजित केली असून 24 डिसेंबरला ही पार्टी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Need ur blessings 😊🙏 pic.twitter.com/3jYYjlw8g7

— KAPIL (@KapilSharmaK9) November 27, 2018

 

बातम्या आणखी आहेत...