आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः विनोदवीर कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत येत्या 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. कपिल आणि गिन्नी यांनी अलीकडेच एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लव्ह लाइफविषयी सांगितले. गिन्नीच्या वडिलांनी सुरुवातीला रिजेक्ट केल्याचे कपिलने यावेळी सांगितले. कपिल शर्माची आई गिन्नीच्या घरी तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी गेली असताना गिन्नीच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. अशी आहे कपिल-गिन्नीची लव्ह स्टोरी....
13 वर्षांपूर्वी झाली होती पहिली भेट...
कपिलने सांगितले- 'मी एचएमवी कॉलेज जालंधर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. मी स्कॉलरशिप होल्डर होतो आणि थिएटरमध्ये नॅशनल विनरही राहिलो. ही गोष्ट 2005 ची आहे, जेव्हा मी आईपीजे कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पॉकेट मनीसाठी नाटक दिग्दर्शित करायचो. मी विद्यार्थ्यांचे ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. गिन्नीसुद्धा ऑडिशनसाठी आली होती. हीच आमची पहिली भेट होती.'
- कपिलने पुढे सांगितले - 'त्यावेळी गिन्नी 19 आणि मी 24 वर्षांचा होतो. मुलींच्या ऑडिशन झाल्यानंतर मी गिन्नीवर इम्प्रेस झालो होतो. मी तिलाच इतर मुलींच्या ऑडिशन घ्यायला सांगितल्या. जेव्हा आम्ही रिहर्सल सुरु केल्या, तेव्हा गिन्नी माझ्यासाठी घरुन जेवण आणत असे. मला सुरुवातीला वाटले की, तिला माझा आदर वाटत असावा म्हणून ती असे करत आहे.'
- गिन्नीने सांगितले - 'कपिलला बघताचक्षणी तो मला आवडला होता. त्यामुळे मी त्याच्यासाठी दररोज जेवण आणत असे. ' कपिलने सांगितले- 'एका मित्राने मला कल्पना दिली होती की, गिन्नी मला पसंत करतेय. पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी मीच गिन्नीला विचारले की, तू मला पसंत करतेस का तर तिने हो असे उत्तर दिले. '
स्वतः केली होती फोन करण्यास मनाई
कपिलने सांगितले- 'गिन्नी माझ्यावर खूप इम्प्रेस झाली होती कारण तिने मला खूप कमी वयात काम करताना पाहिले होते. आमच्यात चांगले ट्युनिंग जुळले होते. मग मी लाफ्टर चॅलेंजच्या ऑडिशनसाठी मुंबईत आलो. पण मला येथे रिजेक्ट करण्यात आले होते. मी फोनवर गिन्नीला म्हटले की, यापुढे मला कधीही फोन करु नकोस. मी तिच्यासोबतची मैत्री तोडली कारण या नात्याचे भविष्यात काहीच होणार नाही, असे मला वाटू लागले होते. मला अपयश आले होते. तिला माझ्यापेक्षा अधिक चांगला आणि कमवता जोडीदार मिळू शकतो, असे मला वाटू लागले होते.
- मी पुन्हा एकदा लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली. तेव्हा गिन्नीने मला फोन करुन माझे अभिनंदन केले होते.
नाकारला होता लग्नाचा प्रस्ताव
कपिलने सांगितले- जेव्हा मी पैसे कमावू लागलो, तेव्हा माझी आई माझ्या लग्नाचा प्रस्ताव गिन्नीच्या घरी घेऊन गेली होती. पण तिच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मी पुन्हा एकदा माझ्या कामात बिझी झालो आणि माझे एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले.
- मी मुंबईत सेटल झालो आणि माझे आयुष्य बरेच बदलले. आयुष्यात एवढे चढउतार आले, पण ही मुलगी कधीही डगमगली नाही. एवढा पेशन्स मी कुणातही पाहिला नव्हता. त्यामुळे गिन्नीच माझ्यासाठी योग्य जोडीदार असल्याचे मला वाटले. जेव्हा पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात चढउतार आले, तेव्हा मी हाच काळ लग्नासाठी योद्य असल्याचे मला वाटले.
- गिन्नीने सांगितले - कपिल अतिशय केअरिंग व्यक्ती आहे. त्याच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही आणि त्याच्यापेक्षा अजून चांगला जोडीदार मला मिळू शकला नसला. जर तो आपल्या आई आणि बहिणीवर जीवापाड प्रेम करतो, तर तो त्याच्या जोडीदारावरही तेवढेच प्रेम करेल.
कपलने शेअर केले लग्नाचे प्लानिंग
दोघांचे लग्न 12 डिसेंबर रोजी जालंधरमध्ये होणार आहे. 10 तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून 11 डिसेंबर रोजी जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईमध्ये देखील एक पार्टी आयोजित केली असून 24 डिसेंबरला ही पार्टी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.