आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर रिकामी बसणार नाही गिन्नी, वाइफला आपल्या प्रोडक्शन हाउसचे क्रिएटिव डायरेक्टर बनवणार कपिल शर्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 38 वर्षाचा कॉमेडियन कपिल शर्मा 'द कपिल शर्मा शो' चे सेकंड सीजन घेऊन आला आहे. त्याच्या प्रीमियर एपिसोडला चांगला रिस्पॉन्स मिळालेलं आहे, ज्यामुळे कॉमेडियनचा कॉन्फिडेंस खूप वाढला आहे. या शोव्यतिरिक्त कपिल आपले प्रोडक्शन हाउस k9 च्या बॅनरखाली पंजाबी चित्रपट आणि कॉमेडी शोज प्रोड्यूस करण्याची प्लानिंग करत आहे. पण कपिल सध्या त्याच्या कॉमेडी चॅट शोमध्ये व्यस्त आहे म्हणून तो आपली पत्नी गिन्नी चतरथला प्रोडक्शन हाउसच्या डायरेक्टरपदी नियुक्त करणार आहे.  

 
प्रोडक्शन हाउसमध्ये क्रिएटिव डायरेक्टर बनणार गिन्नी... 
सूत्रानुसार कळले आहे की, लवकरच गिन्नी जालंधरहुन मुंबईत शिफ्ट होणार आहे. तिने घरी बसावे अशी कपिलची इच्छा नाही. तिला फिल्म मेकिंगबद्दल चांगली माहिती आहे. त्यामुळे कपिल तिला प्रोडक्शन हाउसमध्ये क्रिएटिव डायरेक्टर म्हणून इंट्रोड्यूस करण्याचा विचार करत आहे. गिन्नीची पंजाबी लँग्वेजवर चांगली पकड आहे. तिने रीजनल डिपार्टमेंटमध्येही आपला इंटरेस्ट दाखवला आहे. येणाऱ्या काही महिन्यात कपिल पंजाबी फिल्म आणि कॉमेडी शोजवर काम करायला सुरुवात करणार आहे, जे रीजनल चॅनेलवर दाखवले जाणार आहे आणि गिन्नी त्याकडे लक्ष देणार आहे.  
एकदा प्रीति सिमोस K9 क्रिएटिव डायरेक्टर होती आणि सोबत काम करताना दोघांमध्ये प्रेम जुळले, पण काहीच दिवसांत ते वेगळेही झाले आणि प्रीतिने जॉबही सोडला. आता जेव्हा गिन्नी कपिलच्या लाइफमध्ये आली आहे, तर ती प्रीतीला पॉसिटीव्हली घ्यायलाही तयार आहे.  

बातम्या आणखी आहेत...