आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्कः 2018 मध्ये छोट्या पडद्यावर आलेल्या अनेक नवीन मालिका आणि शोजनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पण काही शोज मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत. एकीकडे 'नागिन 3' आणि इंडियन आयडॉल या सांगितिक रिअॅलिटी शोने भरपूर चर्चा एकवटली, तर दुसरीकडे सलमान खानचे 'बिग बॉस 12' आणि 'दस का दम' हे शोज फ्लॉप ठरले. या कार्यक्रमांनी टीआरपीही मिळवला नाही आणि प्रेक्षकांचे मनोरंजनही केले नाही. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय 2018 मध्ये फ्लॉप ठरलेल्या आणखी काही शोजविषयी..
1. 'बिग बॉस 12' या कॉन्ट्रोव्हर्शिअल शोने प्रेक्षकांची साफ निराशा केली. हा शो सलमान खानने होस्ट केला होता. या शोची संकल्पना आणि स्पर्धक सर्व काही बोअरिंग होते. इतकेच नाही तर टीआरपीच्या टॉप 10च्या यादीत हा शो फक्त दोनदा स्थान पटकावू शकला.
2. सलमान खानच्या 'दस का दम' या शोलासुद्धा प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळू शकला नाही. टीआरपीमध्ये हा शो अतिशय मागे राहिला.
3. दीर्घ काळानंतर कपिल शर्मा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' हा शो घेऊन छोट्या पडद्यावर आला होता, पण या कार्यक्रमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शोचे फक्त तीन ते चार एपिसोड ऑन एअर होऊ शकले. आता कपिल पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो' घेऊन परतला आहे. हा शो 29 डिसेंबरपासून सुरु झाला.
4. टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाची 'बेलन वाली बहू' ही मालिकासुद्धा विशेष कमाल दाखवू शकली नाही. पण हळूहळू हा शोसुद्धा फ्लॉप ठरला आणि डबाबंद झाला.
5. 'दास्तान ए मोहब्बत सलीम अनारकली' हा शोसुद्धा लोकांची अपेक्षापूर्ती करु शकला नाही. या शोमध्ये शाहीर शेख आणि सोनारिका भदौरिया लीड रोलमध्ये होते. अखेर हा शो बंद झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.