आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त जेवणासाठी दूस-यांच्या लग्नात जायचा कपिल शर्मा, एकदा पकडला गेल्यामुळे सापडला होता अडचणीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कॉमेडियन कपिल शर्मा 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न करणार आहे. लग्नापुर्वी कपिलने एका मुलाखतीत खुलासा केला की, तो आपल्या कॉलेजच्या काळात फक्त जेवण करण्यासाठी लग्नांमध्ये जायचा. 'इंडियन आयडल-10'च्या सेटवर पोहोचलेला कपिल कॉलेज डेजविषयी बोलत होता. तो म्हणाला की त्या काळात मी जेवण करण्यासाठी मित्रांसोबत लग्नांमध्ये जायचो. 


लग्नात जेवण करताना पकडला गेला होता कपिल 
- कपिलने शोमध्ये सांगितले की, "आमच्या कॉलेजच्या काळात मी आणि माझे मित्र नेहमीच लग्नांमध्ये जेवण करण्यासाठी जायचो. एकदा एका अंकलने आम्हाला पकडले, तेव्हा माझ्या मित्रांनी खोटी स्टोरी त्यांना सांगितली, मित्र म्हणाले की, आमच्या कॉलेजच्या मेसमधील जेवण संपले आहे आणि आमच्याकडे जेवायला काहीच नाही यामुळे आम्ही आलो"
- कपिल म्हणतो - "आम्हाला पकडण्यापुर्वीच आम्ही जेवण करुन घेतले होते. त्यानंतर अंकलने आमच्यावर जेवण करण्याचा आणि डान्स करण्याचा दबाव टाकला. अशा वेळी आम्ही दोन वेळा जेवलो आणि खुप डान्स केला. हा अनुभव मी कधीच विसरु शकत नाही."

 

शोमध्ये कपिलने एन्जॉय केली बॅचलर पार्टी 
- लग्नाच्या तयारीच्या काळातच कपिलने धुमधडाक्यात इंडियन आयडलच्या सेटवर बॅचलर पार्टी एन्जॉय केली. 
- कपिलचे शोमध्ये वॉर्म वेलकम करण्यात आले. शोचा होस्ट मनीष पॉलने स्टेजवर ढोल वाजवणारे बोलावले होते. कपिलच्या लग्नाच्या आनंदात ढोलवाले ढोल वाजवत होते. ते एवढे जोशात ढोल वाजवत होते की, ढोल फुटून गेला. 

 

कपिल-गिन्नीचे 2 रिसेप्शन होणार 
- कपिल 12 डिसेंबरला गिन्नीच्या घर जालंधर येथे लग्न करेल. कपिल आणि गिन्नीच्या लग्नाच्या विधी 10 डिसेंबरपासून सुरु होतील. या दिवशी कपिलच्या बहिणीच्या घरी मातेचे जागरण ठेवण्यात आले आहे आणि दूस-या दिवशी गिन्नीच्या घरी जालंधरमध्ये संगीत सेरेमनी आणि मेंदी सेरेमनी होणार आहे. 
- लग्नानंतर 14 डिसेंबरला कपलचे पहिले रिसेप्शन अमृतसरमध्ये दिले जाणार आहे. दूसरे रिसेप्शन 24 डिसेंबर मुंबईत होईल. यामध्ये स्पेशल गेस्ट उपस्थित असणार आहेत. 

 

 

 

 

Need ur blessings 😊🙏 pic.twitter.com/3jYYjlw8g7

— KAPIL (@KapilSharmaK9) November 27, 2018
बातम्या आणखी आहेत...