आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी गिन्नीच्या डिलिव्हरीच्यावेळी तिच्यासोबत राहू इच्छितो कपिल शर्मा, 'द कपिल शर्मा शो' च्या शूटिंगमधून घेणार ब्रेक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच पिता बनणार आहे. अशातच त्याने आपली पत्नी गिन्नी चतरथसोबत वेळ घालवण्यासाठी आपला शो 'द कपिल शर्मा शो' मधून ब्रेक घेतला होता. सुमारे 10 दिवसांच्या या ब्रेकदरम्यान कपिल गिन्नीसोबत कॅनडाला गेला होता. जेथील काही व्हिडीओज आणि फोटोजदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. आत असे ऐकण्यात आले आहे की, कपिलने पुन्हा सुट्टीसाठी अर्ज केला आहे. यावेळी त्याला 20 दिवसांचा ब्रेक हवा आहे.  
 

बदलला आहे कपिल शर्मा... 
शोशी निगडित जवळच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हापासून कपिलला कळाले आहे की, तो पिता बनणार आहे त्याचे वागणे खूप बदलले आहे. कपिल सेटवर पूर्णपणे पॉजिटिव्ह असतो आणि अजिबात स्ट्रेस घेत नाही. संधी मिळताच तो गिन्नीसोबत वेळ घालवण्यासाठी घरी निघून जातो. एवढेच नाही तर त्याने चॅनलला नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान 20 दिवसांच्या सुट्टीचा अर्जदेखील केला आहे. 
 

अॅडव्हान्समध्ये करणार आहे शूटिंग... 
कपिल गिन्नीच्या डिलिव्हरीच्यावेळी तिच्यासोबत राहू इच्छितो आणि डिलिव्हरीनंतर काही काळ गिन्नी आणि मुलासोबत वेळ घालवू इच्छितो. त्याने आपली इच्छा चॅनलसमोर व्यक्त केली. कपिलने हे आश्वासन दिले आहे की, ब्रेकवर जाण्यापूर्वी काही एपिसोड्स बँक करून ठेवणार आहे जेनेकरून चॅनलला टेलीकास्टमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये. 
 

बातम्या आणखी आहेत...