आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा या ठिकाणी करणार आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न, समोर आले ठिकाणाचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर. कॉमेडियन कपिल शर्माचे लग्न 12 डिसेंबर रोजी त्याच्या सासरी म्हणजेच जालंधरच्या हॉटेल क्लब कबानामध्ये होणार आहे. लग्नाची तयारी सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात कपिलने त्याच्या लग्नाची घोषणा केली. यावेळी तो त्याच्या सासरच्या घरी आलेला होता. परंतु वेन्यू फायनल झालेला नव्हता. आता लग्न आणि कार्यक्रमांची प्लानिंग सुरु झाली आहे. परंतु वेळ ठरलेली नाही. त्याची होणारी पत्नी गिन्नी चतरथ गुरु नानक नगर, जालंधर येथे राहणारी आहे. 

 

गुरु नानक नगरात सासरच्या घरी सुरु झाली तयारी 
मंगळवारी गिन्नीच्या कुटूबियांनी सांगितले की, हॉटेल क्लब कबानामध्ये 12 डिसेंबरच्या रात्री लग्न होईल. येणा-या तीन-चार दिवसात सर्व प्रोग्राम फायनल केले जातील. लग्नाची तयारी आणि सजावटीचे काम सुरु झाले आहे. गिन्नीने जीएनडीयू कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. कॉलेजच्या काळापासून ती कपिलला ओळखते. कपिलला पहिले साध्या पध्दतीने लग्न करायचे होते. परंतु गिन्नीच्या कुटूबियांना धुमधडाक्यात लग्न करायचे आहे. कुटूबातील मेंबर्सने सांगितले की, लग्नापुर्वी सिक्योरिटीची संपुर्ण काळजी घेण्यात येईल. 

 

गिन्नीसोबत केला आहे कॉमेडी शो
गिन्नी आणि कपिलने एकत्र कॉमेडी शो 'हस्स बलिए'मध्ये काम केले आहे. मार्च 2017 मध्ये कपिल गिन्नीसोबतच्या रिलेशनशीपविषयी बोलला होता. तो म्हणाला होता की, मी कॉलेजच्या काळापासून गिन्नीला ओळखतो. परंतु प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर गेल्याकाही महिन्यांपासून मी तिला चांगल्या प्रकारे ओळखू शकलो आहे. गिन्नी माझी काळजी घेत राहिली. आमच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार आले. परंतु आता मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला गिन्नीपेक्षा चांगली मुलगी मिळू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...