आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या भावी पत्नीने चुडा सेरेमनीत धरला ताल, वधूच्या कुटुंबीयांनी उडवल्या नोटा, गिन्नीच्या मैत्रिणीही थिरकल्या, व्हायरल होत आहेत Videos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माची भावी पत्नी गिन्नी चतरथ हिच्या घरी लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहेत. अखंड पाठानंतर गिन्नीच्या घरी चुडा सेरेमनी झाली. या फंक्शनचे इनसाइड व्हिडिओज व्हायरल झाले असून यात गिन्नी डान्स करताना दिसतेय. समोर आलेल्या व्हिडिओथ गिन्नी लाल रंगाच्या हेवी शरारात घरच्यांसोबत 'मार उडारी...' सॉन्गवर थिरकताना दिसतेय. गिन्नीचा डान्स बघून तिचे कुटुंबीय तिच्यावर नोटा उडवत आहेत. सोबतच गिन्नीच्या मैत्रिणीदेखील तिच्यासोबत बेभान होऊन थिरकताना या व्हिडिओत दिसत आहेत.


कपिलने बॉलिवूड स्टार्सला पाठवली  60 वर्षे जुन्या दुकानातील मिठाई...
- कपिल आणि गिन्नी येत्या 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. कपिलने नातेवाईक आणि बॉलिवूड स्टार्सना वेडिंग कार्डसोबत तोंड गोड करण्यासाठी मिठाईदेखील पाठवली आहे. यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि चिक्कीचा समावेश आहे.

 

- कपिलने ही मिठाई जालंधरमधील 60 वर्षे जुने दुकान लवली स्वीट्समधून पाठवली आहे. कपिल-गिन्नीची लग्नपत्रिका लवली इमॅजिनेशनने डिझाइन केली आहे.


- लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार असून यात बॉलिवूड सेलेब्स सहभागी होणार आहेत. लवली स्वीट्सचे प्रमुख नरेश मित्तल यांनी सांगितल्यानुसार, आमचे नवीन कलेक्शन बघण्यासाठी कपिल आणि गिन्नी त्यांच्या कुटुंबासोबत आले होते. काही डिझाइन्स बघितल्यानंतर त्यांनी पत्रिकेची निवड केली. 

 

सुनील ग्रोव्हरला पाठवले लग्नाचे निमंत्रण
- कपिलच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांची यादी समोर आली असून यात सुनील ग्रोव्हरच्याही नावाचा समावेश आहे. 


- अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, कपिलने त्याचा को-स्टार सुनील ग्रोव्हर अर्थातच 'गुत्थी'ला लग्न पत्रिका पाठवली आहे. कपिल स्वतः सुनीलच्या घरी लग्न पत्रिका द्यायला गेला होता.

 

सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करणार 15 लाख
 - DainikBhaskar.com ला मिळालेल्या माहितीनुसार, कपिलने त्याच्या लग्नात सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच कपिलने त्याच्या मित्र आणि जवळच्या लोकांना लग्नपत्रिका पाठवल्या आहेत. लग्नपत्रिकेसोबत एक स्मार्ट कार्ड अटॅच आहे. 

 

- दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाप्रमाणेच कपिलच्याही लग्नात लोकांना एन्ट्री घेणे सोपे नाही. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना कपिलने लग्नपत्रिकेसोबत पाठवलेले स्मार्ट कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. दीपवीरनेही त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत पाहुण्यांना 'ई-इन्व्हाइट' पाठवले होते. त्यावरील कोड स्कॅन केल्यानंतर पाहुण्यांना एन्ट्री देण्यात आली होती.

 

- कपिलने त्याच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्थेवर 15 लाख रुपयांहून अधिकचा खर्च केला आहे.

 

खाण्यावर होणार आहे 15 लाखांचा खर्च 
- कपिल त्याच्या लग्नात खाण्यावर 15 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज डिशेश असतील. लग्नात पंजाबी फूडसह विविध 100 व्यंजन असतील.


- कपिलच्या घरी लग्नापूर्वी 10 डिसेंबरला माताचे जागरण होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका आणि कपिलची चांगली मैत्रीण असलेली ऋचा शर्मा माताचे भजन गाणार आहे.


- ऋचाशिवाय पंजाबी भजन गायक मास्टर सलीमही परफॉर्म करणार आहे. 10 तारखेला जागरणानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेंदी आणि कॉकटेल ठेवण्यात आले आहे.


- लग्नाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी पंजाबी गायक आणि अभिनेता गुरदास मान परफॉर्म करणार आहे. कपिलची होणारी पत्नी गिन्नी ही गुरदास मानची मोठी फॅन आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी अमृतसह येथे होणा-या रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी त्यांच्या हिट गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन करेल.

 

कबाना रिसॉर्ट आणि स्पामध्ये होणार लग्न...
- कपिलची भावी पत्नी गिन्नी चतरथ ही जालंधरच्या गुरुनानक नगर येथे वास्तव्याला आहे. हे ठिकाण कपूरथला चौकाजवळ आहे. त्यामुळे जालंधर येथे लग्न होणार आहे. कबाना रिसॉर्ट आणि स्पा (या क्लबला कबाना नावानेही ओळखले जाते) दोन दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. येथे मेंदी, संगीत, फेरे आणि एक छोटेखानी रिसेप्शन होणार आहे.


- कपिल शर्माने बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींना लग्नात आमंत्रित केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेकांना त्याने लग्नपत्रिका पाठवली आहे. अमिताभ आणि रेखा यांना स्वतः कपिलने आमंत्रित केले आहे. आतापर्यंत 150-200 लोकांची लिस्ट तयार झाली आहे.

 

कपिल-गिन्नीचे होणार 2 रिसेप्शन...

- लग्नानंतर 14 डिसेंबर रोजी या कपलचे पहिले रिसेप्शन अमृतसह येथे तर दुसरे रिसेप्शन 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...