आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kapil Sharma's Charges Get Reduced In A New Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV वर कमबॅक केल्यानंतर कपिलच्या फीसमध्ये झाली मोठी कपात, कधी एका एपिसोडसाठी घ्यायचा 80 लाख रुपये आता मिळत आहेत केवळ इतकेच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : डिसेंबर, 2018 मध्ये गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्माने टीव्हीवर कमबॅक केला आहे. कपिलचा शो 'द कपिल शर्मा शो सीजन 2' 29 डिसेंबरपासून टीव्हीवर ऑनएयर झाला आहे. शनिवार आणि रविवार च्या पहिल्या दोन एपिसोडला प्रेक्षांची पसंती मिळाली आणि कपिलचे भरपूर कौतुकही करण्यात आले. मात्र, यावेळी कपिलला आपल्या शोसाठी फीसमध्ये खूप कपात सहन करावी लागिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी कपिलला एका एपिसोडचे 15 लाख रुपये दिले जात आहेत. मात्र, मागच्या सीजनमध्ये कपिल एका एपिसोडचे तब्बल 60 ते 80 लाख रुपये चार्ज करायचा. यावेळी कपिल हा शो सलमानसोबत मिळून प्रोड्यूस करत आहे, मागचे सीजन मात्र त्याने स्वतः प्रोड्यूस केले होते. सध्या मात्र कपिल पैशांवर कमी आणि माणसांवर जास्त भर देत आहे. 

 

सुनील ग्रोवरला मिस करत आहे कपिल शर्मा...
कपिलने आपल्या लग्नात सुनील ग्रोवरला इनवाइट केले होते. सुनीलनेही लग्नाला येण्याचे वचन दिले होते मात्र काही कारणांमुळे तो लग्नाला येऊ शकला नाही. नंतर सुनील ग्रोवरने कपिल आणि गिन्नीला सोशल मीडियावर लग्नाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले होते. सुनीलच्या ट्वीटच्या सुमारे 20 दिवसानंतर आता कपिल शर्माने मित्राच्या शुभेच्छेला उत्तर दिले आहे. कपिलने लिहिले - "खूप-खूप धन्यवाद पाजी...मी तुला खूप मिस करत आहे". मध्यंतरीच झालेल्या एका इवेंटमध्ये जेव्हा सुनील ग्रोवरला कपिलविषयी काही प्रश विचारले गेले तेव्हा तो म्हणाला होता - ''मी बिलकुल कपिलच्या विरुद्ध नाही. शोदरम्यान आम्ही केवळ चांगल्या आठवणी जोडल्या आहेत आणि वाईट गीष्टी आम्ही कधीच विसरलो आहोत. कपिल खूप टैलेंटेड पर्सन आहे आणि आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकलो आहोत. आम्ही खूप जास्त काळ सोबत काम केले आणि त्यावेळच्या चांगल्या आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत'' सुनील ग्रोवर सध्या 'कानपुर वाले खुरानाज' मध्ये काम करत आहे. 

 

कपिलच्या शोमध्ये कृष्णा आणि भारतीला मिळत आहे इतकी फीस...
'द कपिल शर्मा शो' सीजन 2 साठी जिथे कपिलला 15 लाख रुपये प्रति एपिसोड मिळत हेत. तिथे कृष्णा अभिषेकला एका एपिसोडसाठी 12 लाख रुपये तर भारती सिंहला सुमारे 10 ते 12 लाख मिळत आहेत. कपिलच्या शोमध्ये किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर हेदेखील आहेत. 

 

वादाच्या भवऱ्यात अडकलेला होता कपिल...

मार्च, 2018 मध्ये कपिलचा नवीन शो 'फैमिली टाइम विद कपिल शर्मा' सुरु झाला होता. पण केवळ 3 एपिसोडनंतरच हा बंद करावा लागला. हा शो सोनी चैनलने कपिलच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शोदरम्यान बातम्या आल्या होत्या की, कपिल डिप्रेशनमध्ये आहे, ज्यामुळे तो शूटिंगच्या सेटवरही जात नाही. त्यांनतर कपिल अजूनच डिप्रेशनमध्ये गेला आणि जास्त दारू पित होता. त्याला उपचारासाठी नोएडाच्या एका रिहॅब सेंटरमध्ये दाखल केले होते. कपिलची कथित एक्स गर्लफ्रेंड प्रीति सिमोसने खुलासा केला होता की, कपिलची मानसिक स्थिति ठीक नाही.  

 

- कपिलने एका एंटरटेन्मेंट साइटच्या एडिटरला फोन करून वाईट शिव्या दिल्या होत्या. कपिलचा आरोप होता की, एडिटरने त्याच्याविरुद्ध चुकीच्या बातम्या छापल्या आहेत. याव्यतिरिक्त कपिलने आपली कथित एक्स-गर्लफ्रेंड प्रीति सिमोस आणि तिची बहीण नीति सिमोसच्या विरुद्धही 25 लाख हडपण्याचा  प्रयत्न केल्याचा आरोप लावून तक्रारही नोंदवली होती.