आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sibal Complains To EC On Narendra Modi News In Marathi

नरेंद्र मोदींच्या वैवाहिक स्थितीवर कपिल सिब्बल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक स्थितीवर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे. या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांनी फसवे शपथपत्र दाखल केल्यासंदर्भात सिब्बल यांनी तक्रार दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या समितीची भेट घेतल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले, की विवाहित असण्यासंदर्भात काही बाबी लपविल्याबाबत आयपीसीच्या काही तुरतुदी अंतर्गत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे. नरेंद्र मोदी यांनी 2002 ते 2012 या दरम्यान गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. त्यावेळी त्यांनी शपथपत्रात विवाहित असल्याची माहिती दिलेली नव्हती.
सिब्बल म्हणाले, की मोदींनी देशापासून ही महत्त्वपूर्ण माहिती लपवून ठेवली होती. परंतु, आता बडोद्यातून लोकसभा निवडणूक लढविताना याचा खुलासा केला आहे. निवडणूक आयोगाच्या समितीने तक्रारीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.