आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात त्वचा आणि केसांसंबंधित समस्यासाठी रामबाण उपाय आहे कापूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंड हवेत त्वचा आणि केसांसंबंधीत समस्या होणे कॉमन आहे. या वातारवणात यांना जास्त केअरची गरज असते. अशा वेळी थोडेसे कापूर तुमची समस्या दूर करू शकते. जयपूरचे आयुर्वेदिक डॉक्टर राजेंद्र कुमावत सांगतात की, फक्त सौंदर्यासंबंधीच नाही तर घरासंबंधीत समस्या दूर करण्यात कापूर मदत करते. 

 

- कोंड्यामुळे त्रस्त असाल तर कोमट खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून मसाज करा. एका तासानंतर केसांवर शाम्पू करा. कोंडा दूर होण्यासोबतच केस मजबूत होतील. 


- पायाच्या भेगांवर मध, कापूर आणि मिठाचा लेप लावा. थोडा वेळ पाय कोमट पाण्यात टाकून बसा. थोड्या वेळानंतर स्क्रब करून मॉश्चराइझर क्रीम लावा. 

- चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर रात्री झोपताना कच्च्या दुधामध्ये थोडेसे कापूर मिसळून कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. 


- थकवा दूर करण्यासाठी अंघोळीला जात असाल तर पाण्यात कापूर इसेंशियल ऑइलचे काही थेंब मिसळा. याने शरीराच्या रक्तप्रवाहात सुधारणा होईल आणि शरीर रिलॅक्स होईल. 


- माशा, डासांमुळे त्रस्त असाल तर घरात कापूर जाळा. याची स्मेल आणि धुराने ते घरातून दूर जातात. वेळोवेळी हा उपाय करत राहा. 


- घरात मुंग्यांमुळे त्रस्त असाल तर पाण्यात कापूर विरघळून घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा. याच्या स्मेलने मुंग्या दूर होतात. ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे. 


- पलंगावर ढेकून झाले तर गादी पहिले उन्हात ठेवावी. यानंतर गादी आणि बेडशीटखाली कापराचे तुकडे टाकावे. याच्या स्मेलने ढेकून दूर होतील. 


- पेट्सच्या मॅट्रेसवर कापराचे तुकडे ठेवावे. याच्या उग्र वासाने केसांमधील उवा दूर होतात. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. 


- किडा चावला तर त्वचेवर इरिटेशन किंवा सूज येण्याची समस्या होते. अशा वेळी कापूर नारळ तेलामध्ये मिसळून अफेक्टेड एरियावर लावा. 


- पिंपल्समुळे त्रस्त आहात तर खोब-याच्या तेलामध्ये थोडेसे कापूर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ लावा. काही दिवसांमध्येच हे सुकेल आणि त्यांचे डाग दूर होतील. 


- केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कोमट खोबरेल तेलात कापूर मिक्स करून केसांवर हल्की मसाज करा. उवांसोबतच लीक नष्ट होतील. 


- एखाद्या जखमेची खूण असेल तर तेथे कापूर पाण्यात मिसळून लावा. थोड्या दिवसात खूण दूर होईल. 

बातम्या आणखी आहेत...