आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या \'केसरी\' च्या जबरदस्त कमाईने इतका खुश झाला करण जोहर की, त्याचा आनंद गगनात मावेना, पण आनंदातच करून बसला मोठी चूक आता देत आहे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अक्षय कुमारच्या 'केसरी' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ट्रेड एनालिस्टनुसार, फिल्मने पहिल्या दिवशी सुमारे 21.50 कोटी रुपये कमवले. प्रोड्यूसर करण जोहर फिल्मच्या कमाईने इतका एक्साइटेड झाला की, त्याने एका अशा ट्वीटला लाइक केले, ज्यामध्ये 'केसरी' ची तुलना शाहरुख खानच्या 'झिरो' सोबत केली गेली होती. एक यूजरने अक्षयच्या 'केसरी' च्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनसाठी एक ट्वीट केले होते. यूजरने लिहिले होते, 'होळीच्या दिवशी 'केसरी' च्या अर्ध्या दिवसाची कमाई शाहरुख खानच्या दिवाळीला रिलीज झालेल्या 'झिरो' पेक्षा जास्त आहे. अक्षयच्या तुलनेत शाहरुखचे स्टारडम काहीच नाही. यासोबतच यूजरने शाहरुखसाठी अपशब्दांचाही वापर केला. या ट्वीटला करणने जसे लाइक केले, शाहरुखचे फॅन्स त्याच्यावर तुटून पडले.  

भडकलेल्या यूजर्सने केले करणला ट्रोल...
- शाहरुखच्या फैन्सने करणला ट्रोल करायला जराही उशीर केला नाही. थोड्याच वेळात सोशल मीडिया #ShameOnKaranJohar अशा ट्विट भराभर येऊ लागल्या... एवढेच नाही शाहरुखच्या फॅन्सने त्याला करणपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आणि म्हणाले, अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे. 

ट्रोलर्समध्ये फसलेल्या करणने असा केला स्वतःचा बचाव... 
सोशल मीडियावर जेव्हा करण चारही बाजूंनी घेरलं गेला तेव्हा त्याने लगेच ज्या ट्वीटला लाइक केले होते त्याला अनलाइक केले. त्यानंतर त्याने एक मोठे ट्वीट करून स्पष्टीकरण दिले. त्याने लिहिले. 'मित्रांनो, माझ्या ट्विटर अकाउंटमध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लम झाला होता. अकाउंटवर काही विचित्र एक्टिविटी होत होत्या. आपोआप बुटांचा फोटो अपलोड होत आहे आणि अशा ट्वीट्सला लाइक केलेले दाखवत आहे ज्यांना मी कधी वाचलेलेही नाही. प्लीज अशावेळी माझ्या सोबत राहा आणि जर माझ्याकडून एखादी चूक झाली असेल तर मला माफ करा. मी माझ्या चुकीला लगेच सुधारतो. '

Guys having a technical problem with my twitter account! Strange things are going on!from uploading shoe picture and gibberish to liking tweets I haven’t even read and would NEVER even acknowledge! Please bear with me and I apologise for any inconvenience! Sorting it out asap!

— Karan Johar (@karanjohar) March 22, 2019

Aaj twitter pe thodi gadbad ho gayi but baaki sab #firstclass hai. 🙈

— Karan Johar (@karanjohar) March 22, 2019

The man who shows believe on you always and support you in starting of your carrer who once ready to take bullet for you and now you are disrespected that person only #ShameOnKaranJohar its really very shameful @karanjohar you should ask apology for this act pic.twitter.com/4VV5K7Vd1K

— shilpi Rai (@shilpirai22) March 22, 2019

त्यानंतर त्याने आणखी एक ट्वीट करून लिहिले, 'आज ट्वीटमध्ये थोडी गडबड झाली पण सर्वकाही फर्स्ट क्लास आहे'

I hate clarifications on SM. @karanjohar is technologically challenged but has other good qualities like his taste in clothes!?Just like Life, twitter doesn’t come with instructions, so mistakes r natural....& also he has fat fingers. Go easy all, Make Lov not War...it’s more fun

— Shah Rukh Khan (@iamsrk) March 22, 2019

शाहरुखने दिले उत्तर... 
करणच्या ट्वीटला शाहरुख खानने उत्तर दिले आणि लिहिले, 'मला स्पष्टीकरण देणे आवडत नाही. तसेही कारण टेक्निकली चॅलेंज आहे.. त्याच्याकडे काही खास क्वालिटीजदेखील आहे. जसे त्याचा कपडे निवडण्याची स्टाइल? आयुष्याप्रमाणे ट्विटर इंस्ट्रक्शनसोबत येत नाही... येथे चुका होऊ शकतात.. आणि हो.. त्याची बोटेही मोटी मोटी आहेत. प्रेम वाटा द्वेष नाही.. हे गम्मत म्हणून घ्या'. 

बातम्या आणखी आहेत...