• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Karan Johar offers 40 crore for Hindi remake of 'Dear Comrade' movie, South star Vijay Devarakonda rejected the offer

Bollywood / 'डियर कॉम्रेड' चित्रपटाच्या हिंदी रीमेकसाठी करण जोहरने ऑफर केले 40 कोटी, साउथ स्टार विजय देवराकोंडाने ठोकरले 

'कबीर सिंह'ची ऑफरदेखील विजयने नाकारली होती

दिव्य मराठी

Aug 02,2019 01:29:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : तेलगु चित्रपट 'डियर कॉम्रेड' सध्या बॉक्सऑफिसवर चांगले प्रदर्शन करत आहे. एका आठवड्यापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम सुरुवात सुरुवात केली आहे. चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये वर्ल्डवाइड 33 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. चित्रपटात साउथ स्टार विजय देवराकोंडासोबत रश्मिका मंडानाने मुख्य भूमिका साकारली आहे. रिलीजपूर्वीच याची जबरदस्त चर्चा होती. ज्यामुळे 6 कोटींमध्ये फिल्ममेकर करण जोहरने याचे हिंदी राइट्स खरेदी केले होते.

विजयला दिली मोठी ऑफर...
करणने राइट्स खरेदी केल्यानंतर चित्रपटात इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांना कास्ट केले गेल्याची बातमी आली होती. ज्या बातम्यांचे करणने खंडन केले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याला विजय देवराकोंडा यालाच कास्ट करण्याची इच्छा आहे. यासाठी त्याने विजयला 40 कोटी रुपयांची ऑफरदेखील दिली होती. पण त्याने ही ऑफर नाकारली आहे.

'कबीर सिंह'ची ऑफरदेखील विजयने नाकारली होती...
विजयचा साउथ चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रीमेक 'कबीर सिंह' मध्ये आधी त्यालाच कास्ट केले जाणार होते मात्र विजयने हिंदी रीमेकमध्ये काम करण्यास नकार दिला होता, त्यानंतर हा चित्रपट शाहिद कपूरकडे गेला. 'कबीर सिंह' शाहिदच्या करियरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.

X