आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Johar Share 6 Stars One Frame Photo: Shah Rukh Khan And Aamir Khan To Ranbir Kapoor & Ranveer Singh Come Together With Deepika Padukone To Alia Bhatt In

शाहरुखच्या मांडीवर आलिया तर रणबीरच्या मिठीत दिसली दीपिका, एका फ्रेमध्ये 6 स्टार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: फिल्म मेकर करण जोहरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करणने एकाच वेळी 6 स्टार्स फ्रेममध्ये कॅप्चर केले आहेत. फोटोमध्ये सुपरस्टार शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि आलिया भट एकत्र दिसत आहेत. एवढेच नाही तर रणबीरने दीपिका आणि रणवीर दोघांनाही आपल्या मिठीत घेतले आहे. ब्रेकअप नंतरही दीपिका आणि रणबीर यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. तर आलिया, शाहरुख आणि आमिरमध्ये बसून क्यूट पोज देत आहे.

 

सर्वांनी एकत्र पाहिला 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तान'चा ट्रेलर 
- आमिरन खानने या दरम्यान सर्वांना आपल्या 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तान'चा ट्रेलर दाखवला. जो सर्व स्टार्सना खुप आवडला आहे. 
- फ्रेंड्सला आपल्या चित्रपटाचा ट्रेलर दाखवताना आमिर फाटलेल्या टी-शर्मध्ये दिसतोय. 
- सोशल मीडियावर या फोटोला खुप पसंती मिळतेय. करणमने याचे कॅप्शन "The biggest BLOCKBUSTER ever"(आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर) असे नाव दिले आहे. 
- रणवीर सिंह आणि आलिया भटची जोडी 'गली बॉय'मध्ये दिसणार आहे. यासोबतच ही जोडी करण जोहरच्या 'तख्त' मध्येही दिसणार आहे. 
- सध्या आलिया लवकरच रणबीर कपूरसोबत करण जोहरच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. 'पद्मावत'नंतर दीपिकाने कोणत्याची चित्रपटाची ऑफिशिअली अनाउंसमेंट केले नाही. लवकरच ती एखाद्या चित्रपटाची अनाउंसमेंट करु शकते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...