आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका आणि निकच्या वयाच्या अंतरावर करण जोहरने केले वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्राने 18 ऑगस्ट रोजी अमेरिकी सिंगर निक जोनससोबत साखरपुडा केला. प्रियांका आणि निकचे अफेअर सुरु झाले तेव्हापासून त्यांच्यामधील वयाच्या अंतराविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. प्रियांका 36 वर्षांची आहे, तर निक अवघ्या 26 वर्षांचा आहे. म्हणजेच दोघांच्या वयामध्ये 10 वर्षांचे अंतर आहे. याविषयी आता प्रियांकाचा मित्र करण जोहरने आपले मत मांडले आहे. 


वयाच्या अंतरावर बोलला करण जोहर 
- एका टीव्ही इंटरव्ह्यू दरम्यान करण जोहरला प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या वयातील अंतराविषयी प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला की, "नात्यात या गोष्टी पाहू नये. मी या गोष्टींविषयी खुप प्रोग्रेसिव्ह आहे. जर तुम्ही नात्यात आनंदी असाल, एकमेकांसाठी योग्य असाल. तर कोण मोठा कोण लहान याचा फरक पडत नाही."

- करण पुढे म्हणाला की, - पुरुषाने वयाने मोठे असावे हा नियम कुणी बनवला. मी नेहमीच माझ्या आजुबाजूला अशा गोष्टी ऐकत असतो, परंतु त्यावर विश्वास ठेवत नाही. मी कधीच अशा गोष्टींना महत्त्व देत नाही.

बातम्या आणखी आहेत...