आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरने आपल्या मुलांच्या संगोपनाविषयी केला खुलासा, सांगितले कसे देतो करण मुलांना आई वडिल दोघांचे प्रेम 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करण जोहरने आपल्या मुलांच्या संगोपनाविषयी बोलताना सांगितले कि. तो त्याच्या मुलांना आई आणि वडिल दोघांचे प्रेम चांगल्या प्रकारे देऊ शकतो. जे लोक त्याच्यावर याबाबतीत चुकीचे बोलतात त्यांच्यावर निशाना साधत तो म्हणाला, "त्या लोकांना काय माहित की, माझ्यामध्ये आई वडिल आहेत की नाही. एखाद्या बाळाला आई वडिल दोघांचे प्रेम देणे आयुष्यातील एक न्यू फेज असते." अशातच करण जोहर, अरबाजचा चॅट शो 'क्वीक हील पिंच बाय अरबाज खान' मध्ये पोहोचला होता, जिथे त्याने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयी बरेच काही सांगितले.  

करणने केला अनेक रहस्यांचा खुलासा...
अरबाज खानने चॅट शोमध्ये करण जोहरशी निगडित सोशल मीडियावरील अनेक कमेंट्स वाचल्या. एकाने कमेंटमध्ये लिहिले होते की, करण अपली मुलगी रूही आणि मुलगा यशाची काळजी कशी घेतो. जर तो स्वतःला मुलांची आई म्हणवतो तर मग त्यांना वडिलांचे प्रेम कसे देतो ?. मुलांच्या लुकबद्दल बोलत असताना करण म्हणाला, "सर्वात आधी तर जे लोक प्रश्न करत आहेत त्यांना सेरोगसीविषयी काहीही माही नाही. एग डोनरवर डिपेंड करते की, तुमची मुले कशी दिसतात आणि असे केवळ देशांमध्येच होते असे नाही, हा इंटरनल जेनेटिक पूलही असू शकतो." करणने पुढे म्हणाला, "जर माझ्या मुलांची काळजी घेण्याचा विषय असेल तर मी माझ्या मुलांना आई आणि वडिल दोघांचेही प्रेम देऊ शकतो. घरी माझी आई असते आणि मुले त्यांना आई म्हणूनच हाक मारतात. मी त्यांची काळजी माझ्या आईसोबत घेतो आणि मला वाटते हे खूप चांगले आहे."

सेरोगसीने झाला होता मुलांचा जन्म... 
सेरोगसीद्वारे 2017 मध्ये करण एक मुलगा आणि एका मुलीचा पिता बनला होता. त्याने आपल्या मुलांची नावे आपल्या आई वडिलांच्या नावांवरून म्हणजेच यश आणि हीरू यांच्या नावातील अक्षरांवरुन ठेवले होते.