'स्टुडंट ऑफ द इयर 2'साठी प्रो-कबड्डी टीमसाेबत टायअप करणार करण, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटात कबड्डीला दिले प्राधान्य 

तरुणांना जोडण्यासाठी केला जाणार आहे हा नवीन प्रयोग... 

दिव्य मराठी

Apr 28,2019 01:13:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : करण जाेहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटात कबड्डीला प्राधान्य देण्यात आले आहे. करण जाेहर लवकरच प्राेकबड्डी टीमसाेबत टायअप करणार आहे. तरुणांमध्ये कबड्डी लाेकप्रिय व्हावी, असा करणचा मानस आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागात वरुण धवन-सिद्धार्थ मल्हाेत्रामध्ये खेळाच्या स्पर्धा दाखवण्यात आल्या हाेत्या. दुसऱ्या भागातील कथेत थाेडे वळण आहे. चित्रपटात इतर खेळही दाखवण्यात आले आहेत. मात्र फोकस कबड्डीवर करण्यात आले आहे.

तरुणांना जाेडण्यासाठी...
छाेट्या शहरांच्या प्रेक्षकांनाही या फ्रँचायझीकडे आकर्षित करण्यासाठी करणने या चित्रपटात कबड्डीला प्राधान्य दिले आहे. यात टायगरला उत्तराखंडमधील छोट्या गावातील तरुण दाखवण्यात आले आहे. याचे शूटिंगही डाेंगराळ भागात झाले आहे. डाेंगराळ भागातील तरुणांना चित्रपटाशी जाेडण्यासाठी कबड्डीचा विचार आल्याचे करण म्हणताे.

कबड्डीत दिसेल अॅक्शन...
नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. यात कबड्डीच्या काही दृश्यात अॅक्शन करताना दिसणार आहे. यात निर्मात्यांनी टायगरच्या अॅक्शन आणि जिम्नस्टच्या शैलीचा वापर केला आहे. वेगवेगळ्या पातळीवर जाऊन त्यांनी यात नवीन अॅक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात टायगर बॅक फ्लिप तर एरियल कार्टिव्हल आणि फ्लाइंग जंप मारताना दिसत आहे.

क्रिएटिव्ह टीमची संकल्पना...
वास्तविक जीवनात क्रिकेटकडे लोक आकर्षित होतात, पण माेठ्या पडद्यावर कबड्डी, हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती आणि अॅथलेटिक्ससारखे खेळ पाहून लोकांमध्ये उत्साहाची भावना निर्माण हाेते, असे चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमचे म्हणणे हाेते. उदाहरण 'चक दे इंडिया', 'मेरी कॉम', 'दंगल' आणि 'भाग मिल्खा भाग' हे चित्रपटच पाहा. हे सर्व चित्रपट एकाच खेळाला समर्पित करण्यात आले हाेते. तथापि, 'स्टुडंट द इयर 2' मध्ये इतर खेळांपेक्षा कबड्डीला जास्त महत्त्व देण्यात आले आहे.

वितरण आणि बाजाराचे गणित करणच्या या चित्रपटाचे फॉक्स स्टार इंडियाच वितरण करणार आहे हे विशेष. कलंकचेदेखील वितरक तेच हाेते. ट्रेड तज्ञांच्या मते, कलंकच्या बाबतीत देखील करणने फॉक्स स्टार इंडियालाच मार्केटिंग आणि वितरण दाेन्हीचे अधिकार दिले हाेते. मात्र येथे त्याने तसे केले नाही. येथे त्याने मार्केटिंगचे कामकाज स्वत:च सांभाळत आहे. प्रो-कबड्डी टीमसाेबत टायअप करण्याचा विचार करणचा आहे.

X