आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Said That, 'kuch Kuch Hota Hai' Film Was Politically Wrong Decision', Shabana Azmi Objected

करणने मान्य केली 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील ही मोठी चूक, शबाना आजमींनी घेतला होता आक्षेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा करण जोहर त्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. ज्यांना आपली चूक स्वीकार करण्यात काही गैर वाटत नाही. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये करणने डायरेक्टर म्हणून आपला डेब्यू चित्रपट 'कुछ कुछ होता है' (केकेएचएच) साठी मान्य केले की, त्याने या गोष्टीवर लक्ष दिले नाही की, चित्रपटात महिलांचे चित्रण नैतिकस्वरूपाने योग्य आहे की, नाही.' 
 

पॉलिटिकली चुकीचा होता 'कुछ कुछ...' : करण... 
करण जोहर म्हणाला, "केकेएचएच राजकीय दृष्ट्या चुकीचा चित्रपट होता. मला आठवते की, शबाना आजमी यांनी यूकेमध्ये कुठेतरी हा चित्रपट पाहिला होता आणि मग मला फोन केला. त्या खूप हैराण होत्या. त्या म्हणाल्या, 'तू हे काय दाखवले आहेस ? त्या मुलीचे केस छोटे आहेत, त्यामुळे ती आकर्षक दिसत नाही आणि जेव्हा तिचे केस मोठे आहेत तेव्हा ती सुंदर आहे.' मी म्हणालो मला खंत आहे, तर त्या म्हणाल्या, 'तुला फक्त एवढेच बोलायचे आहे का' मी म्हणालो, 'हो, कारण मला माहित आहे की, तुम्ही जे म्हणत आहात, ते योग्य आहे."
 

चुकीची जाणीव नंतर झाली... 
करणला आपल्या चुकीची जाणीव खूप उशिरा झाली आणि तेव्हापासून आपल्या चित्रपटांसाठी त्याने खूप कणखर पात्र तयार केले. ज्यामध्ये तीव्र भावना आहेत, सहानुभूती असते आणि ज्यांचे चित्रण काहीही चुकीचा संदेश देत नाहीत.  
 
जोहरवर मुख्यधारेचे लेबल लावले गेले आहे. एक निर्माता म्हणून एक मोठा प्रवास करताना त्याच्या प्रदर्शनाच्या लिस्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक चित्रपट जोडले गेले आहेत, जे तो बनवत आहे. मागच्यवर्षीची त्याची शॉर्ट फिल्म 'लस्ट स्टोरीज' पासून मेघना गुलजारच्या 'राजी' आणि त्याचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' पर्यंत. 
 
करण म्हणाला, ''ज्याप्रकारचे चित्रपट आम्ही बनवतो किंवा प्रोड्यूस करतो, त्याचे क्रेडिट आम्हाला खूप कमी मिळते. आम्हाला अजूनही मुख्यधारेच्या स्वरूपात टॅग केले जात आहे जे योग्य नाहीये." 

बातम्या आणखी आहेत...