आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पद्मावत'नंतर करणी सेनेचा 'मणिकर्णिका' सिनेमाला विरोध, आक्षेपार्ह दृश्‍ये वगळण्‍याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पद्मावत सिनेमानंतर करणी सेनेने झाशीची राणी लक्ष्‍मीबाई यांचा बायोपिक असलेल्‍या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाशी' या सिनेमाला विरोध केला आहे. या सिनेमात आक्षेपार्ह दृश्य असल्‍याचा दावा करणी सेनेने केला आहे. ही दृश्‍ये सिनेमात असणार नाहीत, असे आश्‍वासन निर्मात्‍याने द्यावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. लवकरात लवकर हे आश्‍वासन दिले नाही तर पुण्‍यात या सिनेमाचे शुटिंग होऊ देणार नाही, असा इशारा करणी सेनेतर्फे देण्‍यात आला आहे.

 

याबद्दल निर्मात्‍यांकडून अद्याप कोणतेही स्‍पष्‍टीकरण आलेले नाही. या सिनेमात कंगना रानावत झाशीच्‍या राणीची भूमिका साकारत आहे. झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...