Home | News | karanveer bohra dropped from tv show due to he want to take care of his sick baby girl

आजारी मुलीची काळजी घेण्यासाठी शूटला पोहोचला नाही म्हणून मेकर्सने शोमधून काढले बाहेर, सोशल मीडियावर अभिनेत्याने व्यक्त केले दुःख, माफीदेखील मागितली तरीही मेकर्सला आली नाही कीव

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 02:47 PM IST

अभिनेत्याच्या सपोर्टमध्ये उतरले फॅन्स, मेकर्सला सुनावले खडे बोल... 

 • karanveer bohra dropped from tv show due to he want to take care of his sick baby girl

  मुंबई : 'बिग बॉस' सीजन 12 फेम करणवीर बोहरा बुधवारी एका शोसाठी शूटिंग करणार होता. मात्र अभिनेत्याला शोमधून अचानक बाहेर काढले गेले. कारण हे होते की, त्याला त्याच्या आजारी मुलीची काळजी घेण्यासाठी घरी राहायचे होते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केलेल्या पोस्टमध्ये करणवीरने सांगितले की, तो एक जागरुक पिता आहे आणि त्याला आपल्या प्राथमिकता माहित आहेत. मात्र करणवीरने हे सांगितले नाही की, तो शो कोणता आहे.

  माफीदेखील मागितली पण मानले नाही प्रोडक्शन वाले...
  पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले, ''ही पहिली वेळ आहे, जेव्हा त्यासमोर अशी वेळ आली आहे. मात्र यासाठी त्याने प्रोडक्शन आणि चॅनेलची माफीदेखील मागितली होती. पण तरीही टीमने इमर्जन्सी असूनही टाइमिंग एडजस्ट केला नाही.'' करणवीरने पुढे लिहिले, "तुमच्या आयुष्यात कधी कधी इमर्जन्सी येऊ शकते, जसे की, तुमचे मूल आजारी पडले तर त्यामुळे तुम्हाला शूटला जायला उशीर होऊ शकतो. यासाठी प्रोडक्शन आणि चॅनेलने तुम्हाला ड्रॉप करणे खूप असंवेदनशील आहे. माझ्यासोबत अशी वागणूक यापूर्वी कधीच झाली नाही. अभिनेता होण्याबरोबरच मी एक पितादेखील आहे. मी इमर्जन्सीमध्ये अँलूं मुलीला पत्नी किंवा मोलकरणीच्या भरवश्यावर नाही सोडू शकत.

  अनेकदा चॅनेलमुळे आम्हालाही वाट पाहावी लागते...
  आज सकाळी माझ्या मुलीला माझी गरज होती. मी माझे शेड्यूल डिस्टर्ब करण्यासाठी पुन्हा एकदा प्रोडक्शन आणि चॅनेलची माफी मागतो. अनेकदा असेही होते की, एखाद्या अभिनेत्याला चॅनेल खूप वेळ वाट पाहायला लावते आणि तो तुमच्यासाठी 'एडजस्ट' देखील करतो. जर मलाही अशी वागणूक मिळाली असती तर छान वाटले असते. #Dadlife #Bella #mybabygirl #familyfirst

  करणवीरच्या सपोर्टमध्ये आले सोशल मीडिया यूजर्स...
  करणवीरची पोस्टपहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्स त्याच्या सपोर्टसाठी आले. एकाने लिहिले, 'मेकर्सने ठीक नाही केले पण तू अगदी योग्य केले करणवीर. तसेच आणखी एक व्यक्ती म्हणाला, 'तू एक महान पिता आहेस आणि कुटुंब सर्वात आधी असले पाहिजे. तुला कुणाची माफी मागण्याची गरज नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर करणवीर बोहरा 'क़ुबूल है', 'नागिन', 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'सौभाग्यवती भव' यांसह अनेक शोजमध्ये दिसला आहे.

Trending