आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपुरात सैन्‍य विशेषाधिकार कायद्याला ठाम विरोधः वृंदा कारत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळः मणिपूरमध्‍ये सैन्‍य विशेषाधिकार कायद्याला ठाम विरोध असल्‍याचे मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या नेत्‍या वृंदा कारत यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
मणिपूरमध्‍ये सैन्‍य विशेषाधिकार कायदा हा प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. यासंदर्भात कारत म्‍हणाल्‍या, आमचा या कायद्याला तीव्र विरोध आहे. संसदेमध्‍ये आम्‍ही अनेक वेळा हा मुद्दा उचलून धरला आहे. परंतु, सत्ताधारी पक्षाकडून यावर राजकारण होत असल्‍याची टीका कारत यांनी केली. अशा धोरणामुळे समस्‍या सुटण्‍याऐवजी चिघळण्‍याचा जास्‍त धोका आहे. त्‍यामुळे आताच अंमलबजावणी करण्‍याची वेळ आली असल्‍याचे कारत म्‍हणाल्‍या. मणिपुरातील समस्‍या केंद्र सरकारने चर्चेद्वारे सोडविली पाहिजे. परंतु, केंद्राचे या समस्‍येकडे दुर्लक्ष आहे. राज्‍यात 100 दिवसांची नाकेबंदी होती. याकडे राज्‍य तसेच केंद्रानेही दुर्लक्ष केल्‍याची टीका कारत यांनी केली. सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणांमुळे राज्‍यात जनतेला वीज, पाणी तसेच जीवनावश्‍यक वस्‍तुंचा तुटवडा सहन करावा लागत आहे. 100 दिवसांची कोंडी आणखी लवकर फुटु शकली असती, असेही कारत म्‍हणाल्‍या.